एचडीएफसी बँकेची FD योजना विषयी
HDFC बँक ही भारतातील सर्वात जास्त चर्चेत असलेली आणि विश्वासार्ह खाजगी बँक आहे. बँक नेहमी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या Fixed Deposit योजनांवर आकर्षक व्याजदर ऑफर करते. बँकेतील जे ग्राहक गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील, त्यांना आपले पैसे सुरक्षितपणे गुंतवण्याची संधी बँकेकडून मिळते.
तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असणार आणि तुमच्या जमापुंजीवर चांगला परतावा हवा असेल, आणि त्यासोबत तुमची गुंतवणूक सुद्धा सुरक्षित राहावी, तर HDFC बँकेची 21 महिन्यांची FD खास तुमच्यासाठी आहे. या फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पैशांवर चांगला नफा मिळवू शकता.
HDFC बँकेने आपल्या खास ग्राहकांसाठी 21 महिन्यांच्या कालावधीसाठी एक FD घेऊन आली आहे. ह्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) चा सर्वात मोठा फायदा म्हणजे याद्वारे मिळणारा आकर्षक व्याजदर. FD अंतर्गत बँकेतील सामान्य ग्राहकांना 7% वार्षिक व्याजदर दिला जातो, तर वयोस्कर नागरिकांसाठी हा व्याजदर 7.50% इतका दिला जातो.
म्हणजेच, वरिष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांसाठी या FD योजनेतून जास्त फायदा दिला जात आहे. ही फिक्स्ड डिपॉझिट HDFC बँकेने आपल्या बँकेतील अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना कमी जोखीम घेऊन आपल्या बँकेतील पैशांवर चांगला परतावा मिळवायचा आहे.
या FD मधून मिळणारे फायदे आणि परतावा
FD चा कालावधी 21 महिन्यांचा आहे, म्हणजे 1 वर्ष 9 महिने, आणि या 21 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवर चांगला नफा मिळवू शकता. समजा, तुम्ही या योजनेत 2 लाख 50 हजार रुपये गुंतवले, तर 21 महिन्यांनंतर तुम्हाला FD मधून एकूण 2,82,280 रुपये मिळतील.
तुम्हाला या गुंतवणुकीमधून 32 हजार 280 रुपयांचा नफा मिळेल. हा परतावा आपण बँकेतील सामान्य ग्राहकांसाठी पाहिला, जे ग्राहक 7% व्याजदराच्या श्रेणीत बसतात. आता आपण पाहू की वरिष्ठ नागरिकांनी ह्या FD मध्ये पैसे गुंतवले, तर त्यांना 7.50% व्याजदरानुसार एकूण 34 हजार 716 रुपयांचा नफा मिळेल. म्हणजेच, आपण पाहू शकतो की सामान्य नागरिकांपेक्षा वरिष्ठ नागरिकांना या FD मधून जास्त फायदा मिळतोय.
का निवडावी एचडीएफसी बँकेची ही फिक्स्ड डिपॉझिट योजना?
HDFC बँकेची ही 21 महिन्यांची FD व्यवस्थित पाहिली आणि समजून घेतली तर अनेक घटकांमुळे फायदेशीर आहे. पहिलं कारण म्हणजे, ही FD पूर्णपणे सुरक्षित आहे; सध्या भारतात HDFC बँक ही एक विश्वासू आणि प्रतिष्ठित बँकांच्या यादीत वरती आहे.
दुसरं कारण म्हणजे, बँकेमार्फत या FD वर व्याजदर हा बाजारातील इतर बँकांच्या तुलनेत चांगला आहे. तिसरं कारण म्हणजे, या FD चा कालावधी हा फक्त 21 महिने असल्याने तुम्हाला कमी कालावधीसाठी एक गुंतवणुकीची उत्तम संधी मिळते. त्यामुळे ही FD लहान आणि मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छित ग्राहकांसाठी योग्य आहे.
कोणाला मिळेल फिक्स्ड डिपॉझिटचा जास्त फायदा?
ही FD विशेषतः जेष्ठ नागरिकांसाठी खूप जास्त फायदेशीर दिसत आहे, कारण जेष्ठ नागरिकांना या फिक्स्ड डिपॉझिट मार्फत 7.50% व्याजदर परतावा मिळतो, जो बँकेतील इतर ग्राहकांपेक्षा 0.50% जास्त आहे.
त्यामुळे जर तुम्ही HDFC बँकेतील वरिष्ठ ग्राहक असाल किंवा तुमच्या घरातील कोणी वरिष्ठ नागरिक आणि HDFC बँकेत खाते असेल, तर त्यांच्यासाठी ही FD निवडणे खूप फायद्याचे ठरू शकते. तसेच, जे ग्राहक कमी धोका घेऊन आपल्या पैशांवर चांगला परतावा मिळवू इच्छितात, त्या ग्राहकांसाठी ही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) उत्तम आहे.