Home  |  Poultry Farming: बर्ड फ्लू प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी जैवसुरक्षा तंत्रज्ञान उपाययोजना

Poultry Farming: बर्ड फ्लू प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी जैवसुरक्षा तंत्रज्ञान उपाययोजना

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

बर्ड फ्लू (Bird flu) म्हणजे काय?

बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा (Influenza) विषाणू 'अ' (A) प्रकारामुळे होणारा आजार आहे. या विषाणूचे १६ एच (H1 ते H16) आणि ९ एन (N1 ते N9) असे उपप्रकार आहेत. या उपप्रकारांमध्ये काही उपप्रकार खूप घातक असतात. त्यात विशेष करून H5 आणि H7 घटक खूप तीव्र स्वरूपाचे आजार तयार करतात.

हा आजार प्रामुख्याने आढळतो आणि पक्ष्यांमध्ये खूप लवकर पसरतो; काही वेळा पशुजन्य आजार लोकांनाही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील बर्ड फ्लू परिस्थिती (Bird flu situation in Maharashtra)

महाराष्ट्रात नवीन वर्ष लागताच म्हणजे जानेवारी २०२५ पासून राज्यातील ११ जिल्ह्यांमधील १५ वेगवेगळ्या ठिकाणी बर्ड फ्लूचा (Bird flu) प्रसार होताना आढळला आहे. यापैकी तीन ठिकाणी प्रादुर्भाव वन्य पक्ष्यांमध्ये आढळला, तर १२ ठिकाणी प्रादुर्भाव परसातील आणि बाकी व्यावसायिक कुक्कुटपालनात दिसून आले आहेत.

बर्ड फ्लू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभागाने सुधारित कृती आराखड्यानुसार कठोर पाऊल उचलत तात्काळ कारवाई केली. यात मुख्य म्हणजे ज्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे त्या परिसराचे निर्जंतुकीकरण, त्यासोबत त्या परिसरामध्ये कोंबड्या, अंडी आणि खाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत

आणि ज्या भागात आजार पसरला आहे आणि पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे, अशा पक्ष्यांचा नायनाट करणे यांचा समावेश आहे. नष्ट केलेल्या कोंबड्या, अंडी आणि खाद्याला नीट विल्लेवाट लावून झालेल्या नुकसानीचा शासकीय नियमानुसार अनुदानही देण्यात आले आहे.


बर्ड फ्लू (Bird flu) विषाणूची वैशिष्ट्ये

बर्ड फ्लू विषाणूचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे हा विषाणू वातावरणाच्या परिस्थितीनुसार टिकून राहतो किंवा नष्ट होतो. बर्ड फ्लू थंड आणि ओलसर हवामानात काही महिने जिवंत राहू शकतो. कोंबडीच्या खतात बर्ड फ्लू विषाणू ६ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे कोंबड्या ठेवलेल्या जागेत वेळोवेळी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

त्यासोबत हा विषाणू कोरडे हवामान, उच्च तापमान (High Temp) आणि अतिनील किरणे (अल्ट्राव्हायोलेट (UV)) बर्ड फ्लू विषाणूला निष्क्रिय करतात. तुम्ही ब्लिचिंग पावडर (Bleaching Powder), फॉर्मालिन (Formalin) आणि आयोडीन (Iodine) सारख्या रसायनांनी हा विषाणू नष्ट करू शकता. कुक्कुटपालनात व्यावसायिकांनी वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या पक्षांचे आरोग्य निरोगी राहील आणि तुम्हाला या विषाणूमुळे नुकसान होणार नाही.


पक्षांमध्ये बर्ड फ्लूच्या प्रसाराची कारणे

बर्ड फ्लूचा प्रसार प्रामुख्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे पक्षी, समुद्री पक्षी आणि वन्य पक्षी यांच्या मुळे होतो. हे पक्षी बर्ड फ्लू विषाणूचे नैसर्गिक वाहक असतात. बर्ड फ्लू पक्षांच्या आतड्यांमध्ये वाढतो आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर पडून इतर ठिकाणी पसरतो, बर्ड फ्लूची लागण पक्षांमध्ये दिसत नाही.

कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे पक्षांमध्ये दिसत नाहीत. बर्ड फ्लू बाधित पक्षाच्या विष्ठेद्वारे पाळीव पक्षी कोंबड्या (Chickens), बदके (Ducks), टर्की (Turkeys), लावा (Geese) आणि बटेर (Quails) या सारख्या अजून इतर पक्षांना सुद्धा हा आजार होतो.

याशिवाय दूषित भांडी, मृत पक्ष्यांद्वारे, आजारी पक्ष्यांच्या स्रावांद्वारे, पशु खत वाहने, तिथे काम करणारे कर्मचारी किंवा त्यांच्या कपडे, बूट, तसेच हवेद्वारेही हा आजार पसरतो. तसेच उंदीर, कीटक आणि इतर प्राणीही हा विषाणूचा प्रसार करण्याचे मुख्य कारण ठरू शकतात.


बर्ड फ्लू (Bird flu) आजाराची लक्षणे

बर्ड फ्लू (Bird flu) झालेल्या कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने खालील लक्षणे दिसतात:

१. पहिले लक्षण कोंबड्यांमध्ये अशक्तपणा दिसून येईल आणि त्यांच्या अंडी उत्पादनात घट दिसेल.
२. दुसरे लक्षण कोंबड्यांद्वारे विनाकवचाची अंडी देणे.
३. तिसरे लक्षण नीट लक्ष देऊन पहिले तर कोंबड्यांच्या डोळ्यात, मानात आणि तोंडावर सूज दिसेल.
४. चौथं लक्षण कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होईल, त्यासोबत त्यांना सर्दी आणि खोकला सारखी लक्षणे दिसतील.
५. पाचवे लक्षण कोंबड्यांच्या तुऱ्यांवर लालसर पट्टे दिसतील.
६. सहावे लक्षण कोंबड्यांच्या हालचालीत बदल म्हणजे अनियमित हालचाल, थरथरणे आणि पातळ विष्ठा करणे (विष्ठा ही पांढरी किंवा हिरवी असू शकते).
७. सातवे लक्षण कोंबड्या लक्षणांशिवाय अचानक मरतात.

या आजाराची लक्षणे मानमोडी (Newcastle Disease), आयएलटी (Infectious Laryngotracheitis) आणि फॉउल कॉलरा (Fowl Cholera) सारख्या आजारांशी मिळतीजुळती असल्याने पशुवैद्यकीय सल्ल्याने प्रयोगशाळेतून निदान करणे आवश्यक आहे.

बर्ड फ्लू (Bird flu) नियंत्रणासाठी उपाययोजना

भारतात अजून बर्ड फ्लू आजारासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे जितके शक्य होईल तितके जैवसुरक्षा आणि प्रतिबंधक उपायांवर लक्ष देणे गरजेचे आहे. खालील उपाययोजना करून तुम्ही या विषाणूपासून तुमच्या पक्षांची सुरक्षा करू शकता.

परसातील कुक्कुटपालनासाठी उपाययोजना

१. वन्य प्राण्यांपासून तुमच्या कोंबड्या, त्यांचे खाद्य आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शक्य झाल्यास खाद्य कोरड्या जागेत आणि हवाबंद भांड्यात ठेवावे, जेणेकरून वन्य प्राणी तिथे पोहचणार नाहीत.
२. तुमच्या पक्षांचे संरक्षण करण्यासाठी शेडला जाळे लावून बंदिस्त करा आणि छतावर पत्रा लावा. जेणेकरून बर्ड फ्लू लागण झालेला पक्षी आत शिरणार नाही आणि वन्य पक्ष्यांची विष्ठा आत येणार नाही.
३. तुम्ही जितकी स्वच्छता ठेवणार, तितकेच तुमच्या शेडमधील पक्षी सुरक्षित राहतील. त्यासाठी खाद्य आणि पाण्याची भांडी, शेडमधील अंड्याचे ट्रे आणि शेडमध्ये असणारी सर्व अवजारे नियमित स्वच्छ करावीत. शेडमध्ये मृत कोंबड्या आणि खराब अंडी असतील, तर त्यांना एका खोल खड्ड्यात चुना टाकून पुरावीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पक्षांना आणि अंड्यांना उघड्यावर किंवा पाण्यात टाकू नये. याचा धोका इतर पक्षांना ही होऊ शकतो, त्यासोबत लोकांनाही त्रास होऊ शकतो.
४. अशा परिस्थितीत बाहेरील लोकांवर बंदी घाला. कारण त्यांच्या बुटांमुळे किंवा कपड्यांमुळे हा विषाणू शेडमधील पक्षांमध्ये पसरू शकतो.
५. शेडमध्ये नवीन पक्षी आणले असतील तर त्यांना इतर कोंबड्यांपासून ३० दिवस दुसऱ्या ठिकाणी ठेवा आणि बाजारातून परत आलेल्या कोंबड्यांना १५ दिवस वेगळे ठेवा.
६. शेडमध्ये अनैसर्गिकरित्या पक्षी मरताना आढळत असतील तर पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा किंवा सरकारच्या १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधून त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून लवकरात लवकर उपाययोजना करण्यास मदत होईल.

व्यावसायिक पोल्ट्री फार्मसाठी उपाययोजना

१. कोंबड्या विकल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही ५% फॉर्मालिन शेतीमध्ये फवारावे किंवा शेड स्वच्छ पाण्याने धुऊन काढावा किंवा कॉस्टिक सोडा १ किलो/५००-१००० चौरस फूट पसरवून पाणी शिंपडावे. दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने शेड धुवावे. भांडी जंतुनाशक मिश्रणात भिजत ठेवावी.
२. शेडच्या परिसरात असलेले गवत, झुडपे आणि इतर लहान झाडे काढून टाकणे. शेडच्या मधील किंवा बाहेरील उंदीर आणि घुशींसाठी उपाययोजना म्हणून झिंक फॉस्फेट वापरावे. तुम्ही जमीन नांगरून ५-१०% फॉर्मालिन फवारणी करू शकता.
३. शेडच्या भिंतींना ४ किलो चुना आणि १० लिटर पाण्यात जंतुनाशक मिसळावे आणि शेडला रंग द्यावा.
४. शेडमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी फ्यूमिगेशन म्हणजे धूर किंवा वायूंच्या मदतीने निर्जंतुकीकरण (disinfection) करणे. त्यासाठी तुम्ही १ हजार घनफूट जागेसाठी २०० ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट आणि ४०० मिली फॉर्मालिन मिसळून फ्यूमिगेशन करा. त्यानंतर २४ तासापर्यंत शेड बंद ठेवावे. फ्यूमिगेशन करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक विशेष काळजी घ्या की शेडच्या आत कोणीही नसावे.
५. तुमच्या शेडवर येणाऱ्या अभ्यागत आणि वाहनांवर निर्बंध लावावेत. तुमच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ जंतुनाशक फूटबाथ ठेवावा. जेणेकरून भेट देणाऱ्या लोकांकडून रोगाचा प्रसार होणार नाही.
६. शेडमध्ये नवीन पिल्ले आणण्याचे नियोजन करत असाल तर त्यांच्यात १ महिन्याचे अंतर ठेवावे.
७. तुमच्या शेडमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हात स्वच्छ धुण्याची आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावावी. त्यासाठी त्यांना वेळोवेळी त्याचे प्रशिक्षण द्यायला पाहिजे.

निष्कर्ष

बर्ड फ्लू हा एक घातक आजार आहे. तुमच्या शेडमध्ये त्याचा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा आणि स्वच्छता यांचे बारकाईने पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाने या आजाराने प्रभावित झालेल्या भागात योग्य उपाययोजना केल्या

आहेत. राज्यातील परसातील आणि कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनी वरील तत्त्वांचे पालन केल्यास हा आजार तुम्ही नियंत्रणात आणू शकता. शेडमधील स्वच्छता, तात्काळ उपाययोजना आणि सतर्कता ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि बर्ड फ्लू सारख्या घातक आजारावर नियंत्रण ठेवण्यास उत्तम मार्ग आहे.

टीप

तुम्हाला या विषयी अधिक माहिती हवी असल्यास पुणे येथील रोगनियंत्रण, पशुसंवर्धन आयुक्तालय, सहायक आयुक्त डॉ. भगतसिंग कदम यांच्यासोबत संपर्क साधावा. त्यांना संपर्क साधण्यासाठी पुढे मोबाईल क्रमांक दिला आहे: +91 8275178001.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra heavy rain alert 2025

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: गडचिरोली, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट