लाडकी बहीण योजनेत केलेले बदल
नवीन बदल तुम्हाला वेब पोर्टलवर पाहायला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू करण्यात आली होती. त्यानंतर योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले. महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना ७,५०० रुपये देण्यात आले आहेत.
पण या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा गरीब, निराधार, विधवा, मोल मजुरी करणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या महिलांसाठी ही योजना सरकारने चालू केली, पण योजनेत गैरप्रकार होताना दिसू लागले. त्यामुळे सरकारने वेळोवेळी बदल करून योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता योजनेत दोन मोठे बदल केले आहेत.
वेब पोर्टलवर आता दोन नवीन पर्याय पाहायला मिळणार आहेत. पहिला पर्याय संजय गांधी (Sanjay Gandhi) स्टेटस Yes किंवा No आणि Actions मध्ये पेमेन्ट हिस्ट्री असे नवीन दोन पर्याय दिसतील. या पुढे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांना त्यांचे पेमेंटचे स्टेटस हे आता वेब पोर्टलवर पाहता येणार आहे. चला तर पाहू या सविस्तर कसे असणार आहेत बदल.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का?
जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली, त्यावेळी सरकारने नियम, अटी आणि पात्रता याबद्दल नियमावली दिली होती. पण योजना चालू करण्याच्या गडबडीत आणि पुरेश्या प्रमाणात मोबाईल अॅप (Aap) आणि वेबपोर्टल हे अद्यतन नसल्याने या योजनेत सर्व फॉर्म हे अँप्रोव्ह करण्यात येत होते. अशा परिस्थितीत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला.
अशातच सरकारने परत एकदा भरलेले फॉर्म तपासायला सुरुवात केली आणि ज्या महिला खरोखरच योजनेस पात्र असतील, अशा महिलांना योजनेचा या पुढे लाभ मिळणार आहे. मग सरकारच्या नियमांनुसार संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला पात्र नसणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या वेबपोर्टलवर तुम्ही पाहू शकता, महिलांच्या फॉर्मच्या पुढे "Yes" असे स्टेटस पाहायला मिळेल. "Yes" स्टेटस असलेल्या सर्व महिलांना या पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्या महिलांच्या फॉर्मच्या समोर "No" असे स्टेटस दिसेल, या सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा पेमेंट स्टेटस कसा चेक करावा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दुसरा बदल हा महिलांना पेमेन्ट स्टेटस विषयी करण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले की नाही याबद्दल खूप प्रमाणात अडचण येत होती. त्यांना समजत नव्हते की त्यांना आतापर्यंत किती हफ्त्यांचा लाभ मिळालेला आहे आणि किती हफ्ते येण्याचे बाकी आहेत.
अशा परिस्थितीत सरकारने वेबपोर्टलवर पेमेन्ट स्टेटस चेक करण्याचे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे. पाहू या पेमेन्ट स्टेटस कसे चेक करायचे आणि त्यात कोणती माहिती महिला पाहू शकतात.
1: सर्वात आधी सरकारन तयार केलेल्या अधिकृत वेबपोर्टल चालू करणे. - येथे क्लिक करा
2: नंतर तिथे दिलेल्या "अर्जदार लॉगिन" वर क्लिक करावे, आता तुमच्या समोर लॉगिन पृष्ठ उघडेल.
3: आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड भरावा, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून लॉगिन "Login" बटणावर क्लिक करावे.
4: आता तुमच्या समोर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. आता "Application Submitted" वर क्लिक करा. तुम्हाला आता भरलेले सर्व फॉर्म दिसतील.
5: त्यात "Actions" स्तंभात Indian Rupees चा साइन दिसेल "₹" . त्या साइनवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पानावर तुमच्या पेमेंटची माहिती दिसेल.
6: या पानावर तुम्ही तुमचे नाव, लाभार्थ्यांचे नाव, लाभार्थ्यांचे बँक नाव, अकाउंट नंबर, पेमेंट जमा झाल्याची तारीख आणि पेमेंट स्टेटस तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.
लाडकी बहीण योजनेत महिलांकडून पैसे वसूल केले जातील का?
लाडकी बहीण योजनेत होत असलेल्या गैरप्रकार लक्षात घेता, योजनेत वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत. अशा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यापासून त्यांचा अर्ज बाद करण्यात येत आहे. पण महिलांकडून पैसे वसूल करण्याविषयी सरकारकडून अजून असा कोणताही GR किंवा नियम काढण्यात आलेला नाही.
योजनेत अजून नवीन बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेत बदल करण्यात येतील.
निष्कर्ष (Conclusion)
योजनेत खूप मोठ्या प्रमाणात लाभ हा महिलांना दिला गेला, त्याचाच परिणाम सरकारी तिजोरीवर अधिक भार पडल्याने. सरकारला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन नियम लावावे लागत आहेत.
त्यामुळे ज्या महिलांना खरोखरच योजनेची आणि पैशाची गरज आहे, अशाच महिलांना या पुढे लाभ दिला जाईल. ज्या महिला अगोदर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील, अशा महिलांना सुद्धा योजनेतून बाद करण्यात येणार आहे.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping Click here