आरोग्यासाठी चालण्याची उत्तम वेळ (Right Time to Walk for Health)
व्यायाम सुरु करण्याची पहिली पायरी म्हणजे चालणे (Walking). आपण वजन कमी करण्यासाठी चालतो किंवा आपल्याला आपली फिटनेस व्यवस्थित ठेवायची असेल तेव्हा चालतो. आपण सकाळ-संध्याकाळ रस्त्याने पाहतो. खूप लोक मोकळ्या हवेत चालण्यास (Walking in Open Space) पसंती देतात, कारण मोकळ्या हवेत चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
इतर प्रकारच्या व्यायामांपेक्षा चालणे हा व्यायाम सोपा आहेच, पण घरातील प्रत्येकासाठी लाभदायक सुद्धा आहे. थंडी किंवा उष्णतेच्या दिवसांमध्ये चालताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, चालताना योग्य वेळेत चालायला पाहिजे,
कारण चुकीच्या वेळेस चालल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो (Side Effects of Walking at Wrong Time). म्हणून चालण्याच्या अगोदर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती हवी. कोणत्या वेळेस चालल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होईल आणि कोणत्या वेळेला चालल्याने तुमच्या शरीराला नुकसान होईल (When Should One Go for Walking).
उन्हाळ्याच्या दिवसात चालण्याची योग्य वेळ (Best Time for Walking in Summer)
उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस फिरू शकता. त्याविषयी सविस्तर माहिती पाहू.
सकाळी चालण्याची योग्य वेळ (Right time to walk in the morning)
उन्हाळ्यात सकाळी सूर्योदयाच्या वेळी चालणे चालण्याची उत्तम वेळ आहे. सूरज उगवताच घरातून बाहेर निघा आणि चालायला सुरुवात करा. सकाळी ८ वाजेपर्यंत तुमचं चालणे पूर्ण करा. सूर्योदयाच्या आधी (Time Before Sunrise) हवेत प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त असते (Air Pollution Early Morning).
म्हणून सकाळी सूर्यप्रकाशात चालल्याने त्रास होत नाही. सकाळच्या सूर्यप्रकाशात चालल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी (Vitamin D) मिळत असते. त्याचा फायदा आपल्या हाडांना मजबूत करण्यास होतो.
संध्याकाळी चालण्याची योग्य वेळ (Right time to walk in the evening)
ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, ते संध्याकाळी चालायला जाणे पसंद करतात. अशा लोकांनी संध्याकाळी ४ नंतर फिरायला जावे किंवा ६ ते ८ च्या दरम्यान चालावे. या वेळेस हवेत थंडावा निर्माण होऊ लागतो आणि प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा कमी असते. विशेष म्हणजे, तुम्ही ४ ते ७ च्या दरम्यान फिरणे पसंद करत असणार, ते सुद्धा योग्य आहे कारण यावेळेत शरीराच्या स्नायूंची लवचिकता जास्त वाढलेली असते. त्यामुळे आपल्याला चालणे सोपे होते आणि याचा फायदा आपल्या आरोग्यास मिळतो.
थंडीच्या दिवसात चालण्याची योग्य वेळ (Best Time to Go for a Walk in Winters)
थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे चालणे फायद्याचे आहे. हिवाळ्यात सूर्य उगवल्यानंतरच चालावे, कारण थंडीच्या दिवसात सकाळी थंड हवा असते आणि तापमान कमी असल्याने बाहेर धुके सुद्धा असतात. धुक्यांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. चालल्यानंतर आपण अधिक श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेर धुके असल्याने पुरेसा श्वास आपल्याला मिळणार नाही आणि आरोग्य सुधारण्या ऐवजी जास्त बिघडेल. म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये सूर्य उगवल्यानंतरच चालायला जावे.
तुमच्या चुकीच्या वेळी चालल्याने आरोग्यावर होणारे तोटे (Side Effects of Walking at the Wrong Time)
👉 अंधारात आणि पहाटे लवकर चालणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कारण रात्री आणि पहाटे हवेत जास्त प्रमाणात प्रदूषण असते. त्यामुळे तुम्हाला दमा, खोकला आणि सर्दीसारखे आजार होण्याची दाट शक्यता असते.
👉 थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे चालणे टाळावे (Side Effects of Morning Walk in Winters). कारण जास्त थंड वातावरण आणि धुके असल्याने स्नायूंमध्ये ताण आणि सांधेदुखीसारखे आजार होऊ शकतात.
👉 सूर्योदयाच्या अगोदर वातावरणात थंड हवा असते आणि त्यासोबत प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा जास्त असते. अशा वेळेस फिरलो किंवा चाललो तर आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतात. तुमच्या छातीत जडपणा आणि छाती दुखणे यासारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
Disclaimer
प्रिय मित्रांनो, हे लेख फक्त सामान्य माहिती पुरवण्यासाठी लिहिला गेला आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. krushimarathi.in या माहितीची जबाबदारी घेत नाही.