Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  Healthy Jaggery Water: आरोग्याचा अमृतकुंभ; आजारांवर रामबाण उपाय

Healthy Jaggery Water: आरोग्याचा अमृतकुंभ; आजारांवर रामबाण उपाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पचनसंस्थेसाठी उत्तम पेय

भारतात अनेक लोकांना अपचन, गॅस, ऍसिडिटी यासारख्या आजारांपासून त्रस्त असतात. भारतीय संस्कृतीमध्ये गुळाच्या पाण्याला पचनसंस्थेसाठी एक उत्तम गुणकारी पेय मानले गेले आहे. गुळामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हे अन्न पचवण्यास मदत करतात.

गुळाचे पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. कोणाला गॅस्ट्रिकच्या समस्यां असतील तर गुळाच्या पाण्यापासून आराम मिळतो. त्यासोबत पोट साफ राहते, गॅस आणि ऍसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि हळूहळू शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

गुळाचे पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम

गुळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात. गुळाचे पाणी पिल्याने त्वचा उजळते आणि सौंदर्य वाढण्यास मदत होते. गुळात आढळणारे नैसर्गिक गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात.

नियमित रोज सकाळी गुळाचे पाणी पिल्याने त्वचा उजळते. मुरूम (Acne) कमी होतात आणि त्वचेच्या अनेक समस्या म्हणजे आजार कमी होऊ शकतात.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास उत्तम

गुळातील मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुळाचे पाणी रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. याचा हृदयावर सकारात्मक प्रभाव पडतो. रोज गुळाचे पाणी पिल्याने हृदयविकाराचा (Heart Disease) धोका कमी होतो.

वजन नियंत्रण करण्यास मदत

गुळाचे पाणी शरीरात मेटाबॉलिझम वाढवते. ज्यामुळे शरीरात असलेली अतिरिक्त चरबी जळते म्हणजे शरीराची चरबी कमी होते. गुळात साखरेपेक्षा कमी कॅलोरी असतात. गुळाचे पाणी शरीरासाठी उत्तम आणि आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत करते.

जर तुम्हाला शरीराचे वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी गुळाचे पाणी पिले पाहिजे. गुळाच्या नैसर्गिक गुणांमुळे गुळाचे पाणी वजन नियंत्रण करण्यास मदत करते.

कॅलोरी कमी करण्यास मदत

१०० मिली गुळाच्या पाण्यात ७० ते ८० कॅलोरीज असतात. यात आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषणतत्त्वांचा समावेश असतो. गुळाचे पाणी शरीरासाठी उपयुक्त आहे.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत

भारतात दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहेत आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जात आहे. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक (Zinc) सारखे पदार्थ आढळतात. गुळाच्या पाण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्यास मदत करते.

शरीराचे हाडे मजबूत करण्यास मदत

गुढघेदुखी, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) पासून त्रस्त लोकांसाठी गुळाचे पाणी उत्तम आहे. कारण यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. शरीरातील हाडांचे आरोग्य आणि सांधेदुखी सारखे आजार टाळण्यासाठी गुळाचे पाणी मदत करते.

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत

रोजच्या दैनंदिन वापरांमध्ये केमिकलयुक्त अन्नपदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्याने शरीरात विषारी घटक चिटकून राहतात. गुळाचे पाणी लिव्हर आणि मूत्रपिंड (kidney) स्वच्छ करण्यास मदत करतात म्हणजे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास टाकतात. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि आपल्या त्वचेवरही त्याचा चांगला परिणाम दिसायला मिळतो.

शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत

गुळात लोह आणि फॉलिक अॅसिड सुद्धा असते. रोज गुळाचे पाणी पिल्याने शरीरातील रक्ताची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

महिलांना त्यांच्या मासिक पाळीदरम्यान रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. अशा वेळेस महिलांसाठी गुळाचे पाणी अतिशय फायदेशीर आहे. घरात कोणी महिला गर्भवती असेल तर तिच्यासाठी सुद्धा गूळ चांगला पर्याय आहे.

प्राकृतिक ऊर्जा वाढवण्यास मदत

गुळात आढळणारी नैसर्गिक शक्कर आपल्या शरीराला लगेच ऊर्जा पोहोचवते. शारीरिक थकवा कमी होण्यास मदत करते. तुम्ही जिम किंवा व्यायाम करत असाल तर तुम्हाला शरीराची ऊर्जा वाढवण्यास गुळाचे पाणी उत्तम पेय ठरेल. गुळातील नैसर्गिक तत्त्वांमुळे गुळाचे पाणी शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करते.

गुळाचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

साहित्य: गुळाचे पाणी बनवण्यासाठी १ ग्लास कोमट पाणी घ्या. १ चमचा गूळ (चुरा केलेला असेल तर उत्तम), तुमच्या इच्छेनुसार आणि स्वादासाठी चिमूटभर लिंबू (Lemon) रस.

कृती: एका ग्लासात कोमट पाणी घ्या. त्यात १ चमचा गूळ मिसळा, त्याला पूर्णपणे पाण्यात विरघळेपर्यंत हालवून घ्या. तुम्हाला आधीच चव हवी असेल तर त्यात लिंबाचा रस टाकू शकता. हे गुळाचे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी पिल्याने त्याचा जास्त फायदा शरीराला होतो.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet