Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालणं आवश्यक आहे, या विषयी डॉक्टर काय सांगतात?

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालणं आवश्यक आहे, या विषयी डॉक्टर काय सांगतात?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी ब्रिस्क वॉक (brisk walk) उत्तम आहे

तुम्हाला तुमचे शरीर आणि हृदय निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. त्यातही डॉक्टरांनी ब्रिस्क वॉकला विशेष प्राधान्य दिले आहे. ब्रिस्क वॉकचा अर्थ असा होतो की वेगाने चालणे. ज्यामुळे आपण श्वास जोरात घेत असतो, आपल्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

India TV च्या एका हिंदी कार्यकमात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत डॉक्टर अशोक सेठ यांनी याविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आठवड्याच्या ७ दिवसांमध्ये किमान २०० मिनिटं ब्रिस्क वॉक करणे गरजेचे आहे.

तुम्ही या ७ दिवसांमध्ये रोज ३० ते ४० मिनिटं चालले पाहिजे. रोज चालताना आधी 5 मिनिटं वॉर्मअप आणि नंतरच्या 5 मिनिटांत कूलडाउन करणे आवश्यक आहे.

त्यांनी २०० मिनिटांबद्दल सविस्तर बोलताना सांगितले की, तुम्ही ७ दिवसांच्या आठवड्यातून ५ ते ६ दिवस चालणे आवश्यक आहे. त्यात रोज ३० ते ४० मिनिटे चालावे. जर तुम्ही या धकाधकीच्या जीवनात तुमच्या आरोग्यासाठी हा वेळ काढू शकत असाल, तर हा व्यायाम तुमच्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करेल आणि तुम्हाला हृदयविकारांचा धोका सुद्धा कमी होईल.

चालताना किती वेगाने चालावं? (How fast should you walk?)

आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाहतो, लोक चालण्यासाठी बाहेर निघतात, पण चालताना बोलतात. डॉक्टर सेठ सांगतात की जेव्हा तुम्ही ब्रिस्क वॉक करता, तेव्हा चालण्याचा स्पीड खूप महत्त्वाचा आहे. ब्रिस्क वॉक करताना इतक्या जोरात चालावं की शेजारच्या व्यक्तीशी बोलणं कठीण झालं पाहिजे.

ते सांगतात, तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीशी बोलत असाल तर तुमचा चालण्याचा वेग खूप कमी आहे. ब्रिस्क वॉक करताना तुमचं हृदय खूप वेगाने धडकतं, तुम्हाला घाम येतो आणि तुमचा श्वासोच्छवासाचा वेग खूप वाढतो. असं नाही की प्रत्येक व्यक्तीसाठी हा वेग सारखा असेल; वयानुसार आणि तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुमचा वेग कमी-जास्त होऊ शकतो.

उदाहरणार्थ, तुम्ही तरुण असाल आणि नवीन रक्त असेल तर तुम्ही ५ ते ६ किमी ताशी वेगाने चालू शकता, पण तुम्ही वयस्कर असलात तर हाच वेग ३-४ किमी प्रति तास होऊ शकतो.

जिम करणे हृदयासाठी योग्य ठरेल का? (Is going to the gym good for the heart?)

अनेक लोक डॉक्टरांना प्रश्न विचारतात, जिममध्ये केलेल्या व्यायामामुळे हृदयाला फायदा होतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सेठ सांगतात, जिममध्ये केला जाणारा व्यायाम म्हणजे वेट लिफ्टिंग (weight lifting) किंवा बॉडी बिल्डिंग (body building) ; हे तुमचे स्नायू मजबूत, बळकट करण्यासाठी चांगले आहे.

पण तुम्ही म्हणत असणार, जिममधील व्यायाम केल्याने हृदयाला फायदा होईल असे काही नाही. जिममधील व्यायामामुळे फारसा फायदा होत नाही. याउलट, जास्त वजन उचलल्याने आणि तीव्र व्यायाम केल्याने आपल्या हृदयावर जास्त ताण निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे आपण पाहतो, जिम करताना अचानक हार्ट अटॅक लोकांना येत असतो. त्यापेक्षा एरोबिक व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

हृदयासाठी सर्वात उत्तम व्यायाम कोणते? (What is the best exercise for the heart?)

हृदयाला चांगले, मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी खालील बेस्टएक्सरसाईज उत्तम ठरतात:

ब्रिस्क वॉक (Brisk walk): डॉक्टरांच्या मते हा सर्वात चांगला व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आणि इतर खर्च करण्याची गरज नाही. चालण्यासाठी ही काही अट नाही; तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी तुम्ही चालू शकता.

एरोबिक्स (Aerobics): तुम्हाला नृत्य करण्याची आवड असेल, झुंबा किंवा एरोबिक्स करण्याची आवड असेल तर तुम्ही घरी सुद्धा त्याचा सराव चालू ठेवा किंवा त्यांच्या तुम्ही तुमच्या नजीक असलेल्या क्लासेसमध्ये जाऊन त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ज्यामुळे तुमच्या हृदयाचा व्यायाम होईल, तुमचा छंदही जोपासला जाईल आणि तुम्हाला मजाही येईल.

स्विमिंग (Swimming): पाण्यात पोहणे या पेक्षा उत्तम व्यायाम नाही. कारण यात आपण जोरजोरात श्वास घेतो. त्यासोबत पाण्यात हातपाय मारत असतो. त्यामुळे एकत्रितपणे आपल्या हृदयाचा आणि स्थायूंचा व्यायाम होतो.

सायकलिंग (Cycling): सायकल चालवणे हा आपल्या शरीरासोबत पर्यावरणालाही फायदा देणारा व्यायाम आहे. नियमित सायकल चालविल्याने हृदय निरोगी होते आणि सायकलने कोणत्याही प्रकारचा आवाज, धूर येत नाही; त्यामुळे आपल्या पर्यावरणाचेही समतोल राखला जातो.

रनिंग (Running): तुमची शारीरिक क्षमता उत्तम असेल आणि तुम्ही रोज धावण्यासाठी जात असाल, तर हा व्यायाम तुमच्या हृदयासाठी चांगला पर्याय आहे. तुम्हाला दमाचा आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच रनिंग करा.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या काही खास टिप्स

1. तुम्ही नियमित चालण्याची किंवा व्यायामाची सवय लावून घेणे उत्तम आहे. तुम्ही रोज थोडा वेळ व्यायाम केला किंवा चालला तर तुमच्या शरीरात खूप मोठा बदल पाहण्यास मिळेल.

2. या धकाधकीच्या जीवनात संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या आहारात हिरव्या भाजीपाला असणे आरोग्यासाठी उत्तम आहे. आहारात तेलकट, त्यानंतर तळलेले पदार्थ नको आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळावे.

3. जीवनात जास्त तणाव घेऊ नका, नियमित योगा, ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम करत रहा. हे व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आपले स्वास्थ्य निरोगी राहते. जास्त ताण घेतला तर लवकर तब्बेत खराब होते.

4. वय वाढत जाणे म्हणजे आपल्या शरीराची ताकत कमी होत जाते. त्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या हृदयाची तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला समजेल की आपले हृदय निरोगी आहे की नाही.

5. डॉक्टर नेहमी आपल्याला सांगतात की धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यांचे सेवन करणे टाळले पाहिजे, जेणेकरून आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होईल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet