Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  तुम्हीही वजन वाढवण्यासाठी खजूर खात आहात? मग तुमच्यासाठी खजूर खाण्याचे हे 5 प्रभावी पद्धती.

तुम्हीही वजन वाढवण्यासाठी खजूर खात आहात? मग तुमच्यासाठी खजूर खाण्याचे हे 5 प्रभावी पद्धती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दुधासोबत खजूर खा

खजूर आणि दूध यांचे मिश्रण हे वजन वाढवण्याचे उत्तम पर्याय आहे. दुधात आणि खजूरमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या मधील प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जातात. तुम्ही यासाठी दररोज 1 ग्लास घ्या. त्यासोबत ४ ते ५ खजूर खा. किंवा तुम्ही झोपण्याच्या अगोदर दुधात खजूर टाकून उकळून प्या. याचे सेवन रोज केल्याने तुमचे वजन हळू हळू वाढेल आणि तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा मिळत राहील.

खजूर आणि चणे एकत्र खा

वजन वाढवण्याचा एक सोपा पर्याय हा खजूर आणि चणे एकत्र खाणे. चणे आणि खजूर यांचे मिश्रण नियमित खाल्ल्याने तुम्हाला वजन वाढवण्यास मदत मिळते. आपण वाचले असणार की खजूर आणि चण्यामध्ये शरीरासाठी पौष्टिक असणारे अनेक प्रकारचे पोषक तत्त्वे असतात, जी आपल्या शरीराला नवीन ऊर्जा देण्याचे काम करत असतात आणि आपले वजन सुद्धा वाढवतात.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही मूठभर चणे आणि त्यासोबत ४ ते ५ खजूर खा. तुम्ही चण्याची पूड, त्यासोबत ४-५ खजूर घेऊन यांना दुधात चांगल्या प्रकारे मिसळून खाऊ शकता. हे नियमित खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शक्ती वाढेल, त्यासोबत तुमचे वजनही वाढेल.

दुधात भिजवलेले खजूर खा

वजन वाढवण्यासाठी दुधात खजूर भिजवून खाणे सुद्धा चांगला पर्याय आहे. यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर १ ग्लास दुधात ५-६ खजूर भिजण्यासाठी ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ते खा. तुम्ही रोज या प्रकारे खजूर दुधात भिजवून खाल्याने तुमचे वजन वाढण्यास तुम्हाला मदत होईल. तसेच तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होईल आणि यामुळे शरीरास इतर फायदे सुद्धा होतील.

खजूर आणि गूळ एकत्र खा

गूळ आणि खजूर हे दोघे सुद्धा वजन वाढवण्यासाठी चांगले आहेत. खजूर आणि गूळ या दोघांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराचे वजन वाढवण्यास मदत करतात.

या दोघांचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अ‍ॅनिमियाच्या समस्यांपासून सुटकारा होऊ शकतो. तुम्ही याचे सेवन सकाळच्या नाश्त्यात केले तर उत्तम; त्यासाठी तुम्ही ४-५ खजूर, गूळ आणि १ ग्लास दूध सोबत खा. याचे मिश्रण आहारात समाविष्ट केल्याने वजन वाढवू शकता.

खजूर आणि बदाम एकत्र खा

खजूर आणि बदाम दोघी सोबत खाल्याने तुम्हाला फायदा होईल. कारण दोघांमध्ये आढळणारे कॅलोरीज, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स हे वजन वाढवण्यास उपयुक्त असतात. यांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळतेच, त्यासोबत अनेक आजारांपासून आपले संरक्षण सुद्धा करतात.

तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ४ ते ५ खजूर आणि ५ ते ६ बदाम सोबत खा. किंवा तुम्ही हे दोघे दुधासोबत सुद्धा खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन वाढेल, आजारांपासून शरीराचे संरक्षण करेल आणि शरीर निरोगी राहील.

खजूर का निवडावे?

खजूर निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात आढळणारे फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक साखर. हे आपल्या शरीराचे वजन वाढवण्यास मदत करतात, त्यासोबत आपले आरोग्य सुद्धा सुधारतात. शरीरात खजूर पचायला खूप सोपे आहेत, आणि आपल्या शरीराला लगेच ऊर्जा मिळते.

सप्लिमेंट्सपेक्षा खजूर स्वस्त आहे. सप्लिमेंट्स जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे खजूर हा चांगला पर्याय आहे. खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात पचनाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे खजूरचेही अतिसेवन करणे टाळावे. रोज ४ ते ५ खजूर खाणे उत्तम आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet