Friday, 20 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पिकाचे योग्य नियोजन करत तरुणाने घेतले टरबूजाचे विक्रमी उत्पादन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पिकाचे योग्य नियोजन करत तरुणाने घेतले टरबूजाचे विक्रमी उत्पादन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रशांत हटकर यांच्या यशा विषयी

प्रशांत मोहन हटकर हे हिवरखेड गावातील एक साधारण शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत टरबूजाच्या शेतीतून यश मिळवत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत सव्वा एकर शेतीत ४८ टन टरबूजाचे उत्पादन घेतले.

त्यांनी हे उत्पादन अवघ्या ७० दिवसांत घेतले आहे. या ७० दिवसांत टरबूज उत्पादनाचे योग्य नियोजन, पाण्याचा योग्य वापर आणि पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या शेतात अजून ४ ते ५ टन टरबूज विक्रीसाठी शिल्लक आहे, यामुळे त्यांच्या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यांच्या या यशामुळे त्यांचे नाव पंचकोशीत घेतले जात आहे आणि शेतकऱ्याकडून प्रशांत यांचे कौतुक केले जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि नियोजन

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. टरबूजासारखे पीक घेणे हे जोखमीचे आहे, कारण टरबूजला पाणी, हवामान आणि माती या तिघांचे योग्य संतुलन लागते. प्रशांत यांनी या आव्हानांना मात देत यश मिळवले.

त्यांनी त्यांच्या शेतात टरबूज लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन (Drip Irrigation) चा वापर केला आणि त्यांनी टरबूज पिकाला शास्त्रोक्त पद्धतीने खत दिले. टरबूज पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवत आणि हवामानाच्या अंदाज घेऊन योग्य नियोजन आणि फवारणी केली. या सर्व नियोजनाचा परिणाम म्हणजे त्यांना कमी वेळात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन मिळाले.

प्रशांत यांनी सांगितले की "राज्यातील बदलत्या हवामानात शेती करणे खूप कठीण आणि जोखमीचे आहे. परंतु, शेतातील नवीन आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त शेती पद्धती आणि पिकासाठी योग्य नियोजनाच्या जोरावर कमी दिवसात जास्त उत्पन्न घेता येते." त्याचे हे वाक्य खरे ठरेल, कारण त्यांनी कठीण काळात सुद्धा आपले ध्येय साध्य केले.

कमी खर्चात अधिक नफा

प्रशांत यांच्या या यशामागे आणखी एक खूप महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे त्यांनी हे उत्पन्न कमी खर्चात घेतले आहे. त्यांनी शेतात टरबूजाची रोपे लावण्यासाठी २८ हजार रुपये खर्च केले, खते आणि ठिबक सिंचनासाठी ४१,००० रुपये खर्च केले. त्यासोबत फवारणी, तोडणी आणि इतर सर्व खर्च एकत्र करता त्यांना १ लाख रुपयांचे भांडवल लागले.

परंतु ४८ टन टरबूजाच्या विक्रीतून ३ लाख रुपये मिळाले. म्हणजेच खर्चाचे १ लाख वजा करून प्रशांत यांना ७० दिवसात निव्वळ २ लाख रुपयांचा नफा झाला. हा नफा त्यांचा मेहनतीचा आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचे फळ आहे. प्रशांत यांनी मिळवलेले यश परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

पंचकोशीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रशांत यांच्यासोबत नायदेवी गावातील संतोष कोल्हे यांनी सुद्धा टरबूजाच्या शेतीतून चांगले उत्पादन घेतले आहे. संतोष कोल्हे यांनी आपल्या शेतात 'टारगेट' या जातीचे टरबूज पीक घेतले. त्यांना त्यांच्या परिसरातील महादेव हटकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

प्रशांत हटकर आणि संतोष कोल्हे या दोघा शेतकऱ्यांना महादेव हटकर वेळोवेळी योग्य सल्ला देत गेले. ज्यामुळे टरबूज शेतीत या दोघांना यश मिळाले. या मार्गदर्शनाचा फायदा परिसरातील इतर कष्टाळू शेतकऱ्यांनाही झाला आहे.

प्रशांत यांना आलेल्या अनुभव आणि त्यामधून शिकलेले चांगले गोष्टी इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे आणि उत्तम नियोजनावर भर दिला पाहिजे. तरच शेतीतून उत्तम उत्पन्न मिळवणे शक्य आहे.

प्रशांत यांना आलेले आव्हाने आणि उपाय

आपल्याला माहिती आहे की शेतात प्रत्येकाला यश मिळत नाही. शेतात कष्ट सर्व करतात, पण योग्य नियोजन आणि कष्ट हे शेतकऱ्याला यश मिळवून देऊ शकते. प्रशांत यांनाही टरबुजाच्या शेतात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पाण्याची कमतरता, हवामानातील बदल, आणि सध्या बाजारात टरबुजाची आवक वाढल्याने भावात होणाऱ्या चढ-उतार या सारख्या समस्यांनी त्यांना त्रास दिला.

पण त्यांनी हार नाही मानली, या सर्व समस्यांवर मात करत टरबुजाचे उत्पादन घेतले. शेतात ठिबकचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळला आणि पिकांना हवे तितकेच पाणी दिले गेले. त्यासोबत बाजाराचा अभ्यास करत, पिकाची काढणी आणि बाजारात विक्री करत त्यांनी सर्व समस्यांवर मात करत यश मिळवले.

प्रशांत यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन

प्रशांत हे शेतीकडे खूप सकारात्मक दृष्टिने पाहतात. शेती हा फक्त उदरनिर्वाहाचे साधन नाही, ती एक कला आहे आणि यासाठी मेहनत आणि योग्य नियोजन करून साकारली जाऊ शकते. त्यांनी त्यांच्या अनुभवातून हे सिद्ध केले की, लहान शेतीच्या तुकड्यात मोठे यश मिळवता येते. त्यांचे हे यश माझ्यासारख्या लाखो तरुणांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे प्रशांत यांना शेतात नवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळते.

निष्कर्ष

प्रशांत मोहन हटकर या तरुणाने आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि मेहनतीच्या जोरावर टरबूजाच्या शेतीतून हिवरखेड गावात आणि परिसरात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांनी त्यांच्या सव्वा एकर शेतात ४८ टन टरबूजाचे उत्पादन घेतले आहे आणि त्यात एकूण ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यांनी केलेल्या नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना हे फळ मिळाले आहे.

त्यांनी कमी शेतात आणि कमी खर्चात जास्त नफा कसा मिळवू शकता हे दाखवून दिले आहे. त्यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन केले आहे. त्यांची ही यशोगाथा राज्यातील इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि शेतीला एक नवे वळण देणारी आहे.

प्रशांत यांचे हे यश पाहता खरंच निश्चय करून केलेली मेहनत, नियोजन आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या जोरावर शेतीतूनही मोठे उत्पन्न काढू शकतो आणि आपले स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकतो. त्यांच्या कार्याला आणि यशाला सलाम.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet