Home  |  सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी कशी करावी । अनुदान जमा होण्याची तारीख ठरली

सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी कशी करावी । अनुदान जमा होण्याची तारीख ठरली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोयाबीन आणि कापूस अनुदान | Soyabin kapus anudan 2023

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना घोषित केली. ज्या शेतकऱ्यांकडे 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल त्यांना सरसकट 1000 रु. तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार 5000 रु. प्रति हेक्टर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

2 हेक्टरपर्यंत अट सरकारने लागू केली आहे. या योजनेसाठी सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. दिनांक 29 सप्टेंबर 2024 पर्यंत 68 लाख शेतकऱ्यांची कृषी विभागाने पडताळणी पूर्ण केली आहे.

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि फॉर्म भरणे बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जाऊन लवकरात लवकर फॉर्म जमा करणे. म्हणजे तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाही. 46.68 लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी जोडले गेले आहेत. यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करायचे बाकी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची यादी ही प्रत्येक गावात लावण्यात आली आहे. आपले नाव तपासून ई-केवायसी करून घेणे. चला तर पाहू या ई-केवायसी कशी करायची.

सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी प्रोसेस – Soybean Kapus Anudan E-KYC full process

सोयाबीन कापूस अनुदान 2023 ई-केवायसी आपण कशी करू शकतो पाहू या

1) कृषि विभागाच्या खरीप सोयाबीन कापूस अनुदान 2023 अर्थसहाय्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटची लिंक –   https://scagridbt.mahait.org/

2) कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला  “Disbursement Status”  या बटणावर क्लिक करायचं आहे.

3) क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. आधार नंबर आणि कॅप्चा भरायची जागा तुम्हाला दिसेल.

4) त्यात तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आणि खाली एक कॅप्चा दिसतोय, तो पण भरून घ्या.

5) आता तुमच्या समोर दोन पर्याय दिसत आहेत एक OTP आणि दुसरा बायोमेट्रिक  “Biometric”  .

6) मोबाईलने E-KYC करत असाल तर OTP पर्याय निवडा. (बायोमेट्रिक Biometric मशीन हे जास्त करून CSC सेंटरवर उपलब्ध असते)

7) नंतर Get Adhar OTP क्लिक करा.

8) तुमचा आधार क्रमांक सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 अर्थसहाय्य योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असेल तर तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो व्यवस्थित टाकून Get Data या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 ई-केवायसी पूर्ण होईल.

9) तुम्ही तुमचा डेटा पोर्टलवर चेक करू शकता. आणि E-KYC स्टेटस काय आहे तेही तिथे दिसेल. तुम्हाला मोबाईलने जमत नसेल किंवा मोबाईलने ई-केवायसी करताना समस्या येत असतील तर तुम्ही CSC सेंटरकडे किंवा कृषी सहाय्यकांच्या कडे जाऊन सुद्धा ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करू शकता.

10) CSC सेंटरवर जाताना सोबत स्वतः व्यक्ती, आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर घेऊन जा. आणि तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई-केवायसी करून घ्या.

CSC सेंटरवर वाले लगेच त्या शेतकरी बांधवांची बायोमेट्रिक ई-केवायसी करून देतील. त्यांची फी त्यांना द्यावी लागेल. 30 रुपये किंवा 40 रुपये घेतील.

सोयाबीन कापूस अनुदान साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 ई-केवायसी करण्याकरिता खालील कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहेत:

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड (अपडेटेड आधार).
  • आधारशी लिंक असलेला चालू मोबाईल क्रमांक (OTP साठी आवश्यक)
  • बायोमेट्रिक Biomatric मशीनने ई-केवायसी करायची असेल तर स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे

सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील.

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे काल कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या भाषणात श्री अजित पवार यांनी माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे 96 लाख शेतकरी पात्र आहेत. 68 लाख शेतकऱ्यांची कृषी विभागाने पडताळणी पूर्ण केली आहे.

65 लाख शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात DBT च्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे आज पहिला भरणा करण्यात येणार आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात हे लवकरच रक्कम पाठवण्यात येईल.

तुम्हाला ई-केवायसी किंवा अर्ज करत असताना काही अडचण येत असेल तर किंवा या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही सरकारने दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे निराकरण होईल.

अशी घ्या काळजी जेणेकरून तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाही

1) लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेटेड हवे, म्हणजे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आणि जन्मतारीख हे आधार कार्डमध्ये असावे.

2) OTP हा तुमच्या आधार संलग्न नंबरवर पाठवला जातो. म्हणून KYC करायला जाताना, मोबाईल सोबत न्या. आणि खात्री करून घ्या की त्यात रिचार्ज आहे का, जेणेकरून तुम्हाला सहज OTP मिळेल.

3) बायोमेट्रिक (Biometric) मशीनने ई-केवायसी करताना काळजी घ्या, तुमची बोट साफ हवी. नाहीतर मशीन तुमचे बोट डिटेक्ट करत नाही आणि तुम्हाला ई-केवायसी करायला त्रास होईल.

4) ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही तुमची माहिती आवश्य चेक करा. खात्री करून घ्या की केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही.

5) तुमचं आधार कार्ड हे बँकेशी संलग्न आहे की नाही, तपासून घेणे. नसेल तर बँकेत जाऊन खात्याची ई-केवायसी करून घेणे. जेणेकरून तुम्ही मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहू शकणार नाही.

हेल्पलाइन नंबर

तुम्हाला काही समस्या असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. - 022- 6131 6401

निष्कर्ष (Conclusion)

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन आणि कापूस अनुदान योजना आर्थिक मदत करण्यासाठी बनवली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत शेती आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे आणि ती लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. ई-केवायसी करणे सोपे असून शेतकरी बांधव ती मोबाईल, सीएससी सेंटर किंवा कृषी कार्यालयात जाऊनसुद्धा पूर्ण करू शकतात.

ई-केवायसी करताना कसलीही अडचण येऊ नये म्हणून योग्य कागदपत्रे जवळ असू द्यावी. तुमच्या बँक खात्यासोबत आधार संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती किंवा काही अडचणी असतील तर वर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा.

सोयाबीन आणि कापूस अनुदान FAQ’s

प्रश्न 1:सोयाबीन आणि कापूस अनुदान केव्हा घोषित झाले?
उत्तर: सोयाबीन आणि कापूस अनुदान हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प बजेटमध्ये 05 जुलै 2024 रोजी घोषित केले.
प्रश्न 2: सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून जमा होणार आहे?
उत्तर: 30 सप्टेंबर 2024 पासून अनुदान वाटपाची सुरुवात होणार आहे. अनुदान हे DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
प्रश्न 3: कापूस आणि सोयाबीनसाठी ई-केवायसी करण्याचे प्रकार कोणते?
उत्तर: शेतकरी बांधव सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळवण्यासाठी दोन प्रकारे E-KYC करू शकतात, पहिला पर्याय मोबाईल क्रमांकावर OTP मिळवून आणि दुसरा पर्याय बायोमेट्रिक ( Biometric machine)
प्रश्न 4: अनुदानासाठी कोण पात्र असणार आहे?
उत्तर: सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी या अनुदानाचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
प्रश्न 5: सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी किती हेक्टर शेतीची अट आहे?
उत्तर: महाराष्ट्र सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी 2 हेक्टर शेतीची अट ठेवली आहे.
प्रश्न 6: सोयाबीन आणि कापूस अनुदान देण्यामागचे कारण काय?
उत्तर: राज्यात मागच्या वर्षी म्हणजे 2023 साली शेतकरी बांधवांकडून सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन आणि कापूस खरेदी केली. याचे नुकसान शेतकरी वर्गाला भोगावे लागले, म्हणून सरकारने सोयाबीन आणि कापूससाठी अनुदान घोषित केले.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Pradhan mantri kisan samman nidhi yojana

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

Magel tyala solar pump yojana maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

Namo shetkari mahasmman nidhi yojna th installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी

How to check status of pm kisan payment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

Pradhan mantri kisan fpo yojana

PM Kisan FPO Yojana: सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे

Plastic mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

Shetkaryanchya kalyanasathi rabavnyat yenarya yojana

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना

Mangel tyala solar pump yojana payment sms

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

Special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

Rabbi hangam digital crop survey

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Magel tyala solar krushi pump vendor selection option

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

How to do rabi season e pick inspection

रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती