Thursday, 19 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दरमहा ५५५० रुपयांचे स्थिर व्याज

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दरमहा ५५५० रुपयांचे स्थिर व्याज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंथली इनकम स्कीम (MIS) काय आहे?

पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चालू केलेली योजना आहे. त्यात तुम्ही एकदाच गुंतवणूक करून दरमहा व्याजाच्या रूपात एक नियमित उत्पन्न मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला एकदाच एक रक्कम जमा करावी लागते आणि त्यानंतर तुमच्या पोस्ट खात्यात दरमहा व्याज जमा होत राहतं.

सध्या या योजनेच्या गुंतवणुकीवर "७.४ टक्के वार्षिक व्याजदर" मिळत आहे. ते अन्य योजनांपेक्षा जास्त आहे. हे व्याज तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिले जाते म्हणजे तुमच्या खात्यात जमा केले जाते. ही गुंतवणूक "५ वर्षांची" असणार आहे.

म्हणजे याला आपण ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असे म्हणू शकतो. पोस्ट ऑफिसच्या बँकेत तुमचे वैयक्तिक खाते असेल तर तुम्ही या योजनेत कमीत कमी १,००० रुपये ते जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता. तुमचे संयुक्त खाते असेल तर तुम्ही १५ लाख रुपयांपर्यंतची राशी जमा करू शकता.

योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दरमहा ५५५० रुपये कसे मिळतील?

आता आपण समजून घेऊ कशा प्रकारे या योजनेमधून तुम्ही वैयक्तिक खात्यावर ५,५५० रुपये प्रत्येक महिन्याला कमावू शकता. तुम्हाला यासाठी आधी ९ लाख रुपये गुंतवावे लागतील. गुंतवलेल्या रकमेवर ७.४ टक्के व्याजदर मिळत असल्याने तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये व्याज मिळेल. हे सविस्तर समजून घेऊ.

👉 ९ लाख रुपयांवर ७.४% नुसार संपूर्ण वर्षाचे व्याज ६६,६०० रुपये होते. (९,००,००० × ७.४% = ६६,६०० रुपये)

👉 दरमहा किती मिळतील यासाठी आपल्याला ६६,६०० रुपये १२ महिन्यांनी भागून घेऊन म्हणजे या हिशोबाने तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये मिळतील. (६६,६०० ÷ १२ = ५,५५० रुपये)

तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दरमहा ५,५५० रुपये मिळत राहतील. ५ वर्ष झाल्यानंतर तुमची मुद्दल रक्कम ९ लाख रुपये तुम्हाला परत मिळेल आणि ५ वर्षांपर्यंत तुम्हाला ३ लाख ३३ हजार रुपये मिळालेले असतील. (५,५५० × ६० महिने = ३,३३,००० रुपये).

संयुक्त खात्यावर दरमहा ९,२५० रुपये कसे मिळतील?

तुम्ही संयुक्त खात्यावर ९,२५० रुपये प्रत्येक महिन्याला कमावू शकता. तुम्हाला यासाठी आधी १५ लाख रुपये गुंतवावे लागतील. गुंतवलेल्या रकमेवर ७.४ टक्के व्याजदर मिळत असल्याने तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये व्याज मिळेल. हे सविस्तर समजून घेऊ.

👉 १५ लाख रुपयांवर ७.४% नुसार संपूर्ण वर्षाचे व्याज १,११,००० रुपये होते. (१५,००,००० × ७.४% = १,११,००० रुपये)

👉 दरमहा किती मिळतील यासाठी आपल्याला १,११,००० रुपये १२ महिन्यांनी भागून घेऊन म्हणजे या हिशोबाने तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये मिळतील. (१,११,००० ÷ १२ = ९,२५० रुपये)

तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दरमहा ९,२५० रुपये मिळत राहतील. ५ वर्ष झाल्यानंतर तुमची मुद्दल रक्कम १५ लाख रुपये तुम्हाला परत मिळेल आणि ५ वर्षांपर्यंत तुम्हाला ५ लाख ५५ हजार रुपये मिळालेले असतील. (९,२५० × ६० महिने = ५,५५,००० रुपये).

गुंतवणुकीसाठी असलेल्या अटी

1️⃣ योजनेत गुंतवणूक करण्यासाठी १५ वर्ष पूर्ण हवे आणि भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2️⃣ पालकांना आपल्या १० वर्षांवरील मुलांसाठी गुंतवणूक करायची असेल तर, पालकाच्या नावे खाते उघडू शकतात; त्यानंतर मूल १८ वर्षांची झाल्यानंतर स्वतः खात्याची देखरेख करू शकता.

3️⃣ जास्तीत जास्त ३ जण संयुक्त खाते उघडू शकतात. ज्या खात्याची मर्यादा १५ लाख रुपये आहे.

4️⃣ परदेशात राहणारे भारतीय नागरिक, ज्यांना आपण एनआरआय (NRI) ने संबोधतो, ते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

5️⃣ MIS चा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळ पोस्ट ऑफिसचे बचत खाते असणे आवश्यक आहे. खाते नसेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

MIS योजनेचे फायदे

1️⃣ बाजारात होणाऱ्या चढ-उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. दरमहा तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळेल.

2️⃣ पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या आधीन येते, यामुळे तुमची गुंतवणूक १००% सुरक्षित आहे.

3️⃣ तुम्ही तुमचे खाते एक पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला जवळ आणि सोयीच्या दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करून घेऊ शकता.

4️⃣ मिळणाऱ्या व्याजावर सरकार टीडीएस लावत नाही. पण तुमच्या कर स्लॅबनुसार ती रक्कम करपात्र आहे. म्हणजे तुम्हाला कर सवलत मिळणार नाही.

5️⃣ करात ८०सी अंतर्गत कोणत्याही प्रकारची सूट नाही.

मंथली इनकम स्कीम (MIS) खाते कसे उघडाल?

1️⃣ तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

2️⃣ पोस्ट ऑफिसमध्ये MIS खाते उघडण्यासाठी फॉर्म भरा.

3️⃣ खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक पुरावे द्या. (ओळखसाठी आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा)

4️⃣ तुम्ही १,००० रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करा.

5️⃣ काळजी घ्या, तुम्ही १ वर्षानंतर खाते बंद केले तर २% पर्यंत दंड आकारण्यात येतो.

6️⃣ तुम्ही ३ वर्षानंतर खाते बंद केले तर १% दंड आकारण्यात येईल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet