Thursday, 19 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  फिक्स्ड डिपॉझिट (FD) मधील स्वाइप-इन आणि स्वाइप-आउट विषयी समजून घेऊ

फिक्स्ड डिपॉझिट (FD) मधील स्वाइप-इन आणि स्वाइप-आउट विषयी समजून घेऊ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) म्हणजे काय?

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एक ठराविक रक्कम जी तुमच्या बँक खात्यात जमा आहे. त्या रकमेला ठराविक कालावधीसाठी, म्हणजे महिने किंवा वर्षांसाठी, बँकेत जमा करणे, जिथे बँकेकडून तुम्ही जमा केलेल्या रकमेवर निश्चित केलेला व्याजदर मिळतो.

ही गुंतवणूक तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे एक माध्यम आहे. कारण तुमचे पैसे बँकेकडे सुरक्षित राहतात आणि ठरवलेल्या मुदतीनंतर तुम्हाला तुमचे पैसे व्याजासह परत मिळतात. पण तुम्ही पूर्वी FD केली असेल तर तुम्हाला माहिती असेल.

तुम्हाला पैशांची अडचण असेल आणि फिक्स्ड डिपॉझिटमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला पूर्ण FD मोडावी लागते. आणि मधील FD मोडली तर त्यावरील व्याज कमी मिळते. यावर उपाय म्हणून बँकांनी "स्वाइप इन" आणि "स्वाइप आउट" पद्धत लोकांसाठी अमलात आणली.

स्वाइप इन (Sweep-in) म्हणजे काय?

"स्वाइप इन" म्हणजे तुमच्या बचत खात्यातील (Savings Account) पैसे थेट FD मध्ये गुंतवायला येतात, सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा, तुमच्या बँक खात्यात जास्त पैसे आहेत आणि तुम्हाला त्यावर चांगले व्याज हवे आहे, तर तुम्ही ते पैसे बँकेत जाऊन किंवा डिजिटल बँकिंगद्वारे FD मध्ये टाकू शकता.

एकदा FD झाली की, खाली तुम्हाला "स्वाइप इन" पर्याय असतो. तो पर्याय निवडला की, तुमच्या FD वर "स्वाइप इन" विकल्प लागू होतो. म्हणजे तुमच्या पैशांवर FD सारखे व्याजदर मिळेल. आणि तुम्हाला जेव्हा पैशांची गरज भासेल, तेव्हा तुम्ही त्या FD मधून पैसे काढू शकता.

एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही पूर्ण पैसे काढत नाही, तोपर्यंत FD बंद होत नाही. आणि तुम्हाला तुमच्या पैसांवर फिक्स्ड डिपॉझिटसारखा परतावा मिळत राहतो.

स्वाइप आउट (Sweep-out) म्हणजे काय?

"स्वाइप आउट" म्हणजे तुम्ही केलेल्या FD मधून तुम्हाला आवश्यकतेनुसार पैसे काढणे. रेग्युलर FD मध्ये तुम्हाला पूर्ण FD तोडावी लागायची, त्याचा परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा पाहायला मिळत होता. पण "स्वाइप आउट" सुविधेमुळे तुम्हाला पूर्ण FD तोडण्याची गरज नाही.

तुम्ही आवश्यक तेवढीच रक्कम तुमच्या FD मधून काढू शकता आणि उर्वरित रक्कम ही जशीच्या तशी FD मध्ये गुंतवलेली राहते. या सुविधेमुळे तुम्हाला पैसा हा सहज उपलब्ध होतो आणि व्याजही मिळत राहते.

उदाहरणार्थ, समजा तुम्ही १ लाख रुपयांची FD केली असेल आणि तुम्हाला २०,००० रुपयांची गरज भासली, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण १ लाखाची FD मोडावी लागणार नाही; तुम्ही फक्त २०,००० "स्वाइप आउट" करू शकता आणि उरलेल्या ८०,००० रुपयांची FD जशीच्या तशी वाढत राहील.

स्वाइप इन (Sweep-in) आणि स्वाइप आउट (Sweep-out) चे फायदे

१. या सुविधेमुळे तुमच्या Fixed Deposit ला लवचिकता येते, म्हणजे तुम्ही कधीही पैसा जमा करू शकता आणि कधीही काढू शकता. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळते.
२. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजेपेक्षा फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये जास्त व्याज तुम्हाला मिळत असते.
३. इतर ठिकाणी पैसे गुंतवले तर ते सुरक्षित राहत नाहीत. पण बँकेत तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
४. ऑनलाईन बँकिंग सुविधेमुळे हे खूप सोईस्कर झाले आहे.

निष्कर्ष

"स्वाइप इन" आणि "स्वाइप आउट" सुविधा आल्यापासून FD मध्ये रुची ठेवणाऱ्या लोकांसाठी हे केवळ सुरक्षितच नाही तर त्यांच्या FD ला एक प्रकारे लवचिकता ही आली आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील पैशांवर चांगले व्याज हवे असेल आणि तुमच्या गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा हवी असेल, तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे.

तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर बँकेत जाऊन माहिती घ्या किंवा तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरसोबत संपर्क साधा; तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet