Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  चेहऱ्यावरील तीळ काढायचे ५ घरगुती उपाय, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे तीळ नाहीसे होतील

चेहऱ्यावरील तीळ काढायचे ५ घरगुती उपाय, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे तीळ नाहीसे होतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावा

लसणात अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. लसूणमध्ये आढळणारे हे गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. लसूण पेस्टचा वापर करून तुम्ही तीळसोबत तुमच्या चेहऱ्यावर असणारे मुरूम, पुरळ आणि डाग यांपासून आराम मिळवू शकता. यासाठी लसणाच्या २-३ पाकळ्या घ्या. त्यांचे पेस्ट बनवा आणि आता ते तिळीवर किंवा चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकण्याची वाट पहा. मग कापडाने किंवा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा घरगुती उपाय रोज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील तीळ आणि इतर समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. लसूण प्रत्येकाच्या चेहऱ्याला सूट होईल असे नाही. त्यासाठी पेस्टची टेस्ट घ्या म्हणजे आधी फक्त थोडं लावा. आणि पहा, जळजळ होतेय का. असे काही लक्षण दिसले नाही तर चेहऱ्यावर लावा. जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चेहऱ्यावर एरंडेल तेल लावा

असं म्हंटले जाते की एरंडेल तेलचा वापर त्वचेवर केला तर त्याने त्वचेला खूप फायदा होतो. तुम्हाला एरंडेल तेल वापरून तीळ काढायची असेल तर हा सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्ही यात थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा मिसळू शकता आणि या दोघांच्या मिश्रणापासून पेस्ट बनवा. हे पेस्ट चेहऱ्यावरील तिळीला लावा आणि पेस्टला सुकू द्या; सुकल्यावर पाण्याने धुवा. हा घरगुती नुस्का आठवड्यातून २ वेळा जरूर करा. तुमच्या चेहऱ्यावरील तीळ कमी होण्यास मदत मिळेल. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा: तुमचा चेहरा आणि त्वचा खूप संवेदनशील असेल तर एरंडेल तेलात बेकिंग सोडाचा वापर करू नका. कारण बेकिंग सोडाच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते. यासाठी तुम्ही फक्त एरंडेल तेलाचा वापर करू शकता.

चेहऱ्यावर चुन्यापासून तयार केलेला चुना पेस्ट लावा

तुम्ही गावातील कोणत्याही जुन्या माणसांना विचारले असता, ते तुम्हाला चेहऱ्यावरील तीळ काढण्यासाठी तिळीवर चुना लाव असा सल्ला देतील. कारण ही तसेच आहे. कारण चुन्यात ज्वलनशील गुणधर्म जास्त असतो. त्यामुळे चुना लावल्याने त्वचेवरील अनावश्यक पेशी (skin cells) आपोआप नष्ट होतात. म्हणून चुना वापरणे हा खूप जुना आणि प्रभावी उपाय मानला गेला आहे. याला वापरण्यासाठी सोपी पद्धत आहे. चुना पावडर घ्या. ती पावडर पाण्यात मिसळून एक पेस्ट तयार करा. आता त्या पेस्टला चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावरील पेस्ट सुकू द्या. सुकल्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुवा. पेस्ट रात्रभर लावून ठेवू शकता. पण त्वचेची जळजळ होत असेल, तर सुकल्यानंतर लगेच धुवा. अशा प्रकारे चुन्यापासून तयार केलेली पेस्ट २-३ वेळा वापरल्यास चेहऱ्यावरील तीळ हळूहळू कमी होऊ लागेल.

चेहऱ्यावर अगरबत्तीचा वापर करा

अगरबत्तीचा वापर तीळ काढण्यासाठी थोडा हटके, पण आपण त्याला पारंपरिक उपाय म्हणू शकतो. त्यासाठी सर्वात आधी अगरबत्ती पेटवून घ्या. तिला २ ते ३ सेकंदांनी लगेच विझवा. अगरबत्तीला आता तिळीवर हलकेच लावा. असे केल्याने तुम्हाला थोडी जळजळ होऊ शकते; हा उपाय जितका सोपा वाटतोय, तितकाच धोकादायक सुद्धा आहे. कारण चुकून जास्त वेळ अगरबत्ती तीळावर ठेवली तर त्याजागी जखम किंवा डागही पळू शकतो. आमच्या मते, हा उपाय करण्या अगोदर त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम असेल. सावध राहून हा उपाय करा.

चेहऱ्यावर सफरचंदाचा व्हिनेगर लावा

सफरचंदाचा व्हिनेगरचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची, केसांची आणि तीळ कमी करण्यास आणि काढण्यास सुद्धा वापरू शकता. त्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा सफरचंदाचा व्हिनेगर घ्या. सोबत कॉटन घ्या आणि कॉटनचा वापर करून तीळावर त्याला लावा. रात्रभर लावून तसंच ठेवा आणि सकाळी उठून चेहरा मस्त स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय नियमित करत राहा. तुम्हाला दिसेल की तीळ हळूहळू कमी होईल. पण त्यासोबत दक्षता सुद्धा घ्या. हे व्हिनेगर लावल्याने तुमच्या त्वचेवर जळजळ होणार नाही. यासाठी आधी हातावर टेस्ट करा, मग चेहऱ्यावर लावा. कारण खूप लोकांची त्वचा ही खूप संवेदनशील असते. म्हणून जपून वापर करा किंवा डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

जोखीम टाळण्यासाठी काही खबरदारी

1. हे सर्व घरगुती उपाय आहेत. पण आपण हे त्वचेवर वापरत आहोत, म्हणून काळजी घ्या. तुम्हाला त्वचेवर जळजळ किंवा ऍलर्जीसारखे जाणवत असल्यास लगेच हे सर्व थांबवा.
2. तीळ लहान असेल तर हे घरगुती उपाय करण्यास काही हरकत नाही. पण तीळ मोठी आणि तुम्हाला त्याविषयी शंका जात असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण काही वेळा तीळ हे तुमच्या आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकते. काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

अस्वीकरण (Disclaimer)

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा लेख फक्त सामान्य माहिती प्रदान करण्यासाठी आणि सल्ल्यासाठी लिहिला आहे. या उपायांचा वापर करण्याअगोदर तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. krushimarathi.in या माहितीची जबाबदारी घेत नाही.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet