बीएसएनएल (BSNL) चा नवीन लोगो आणि स्लोगन
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीचे येणार अच्छे दिन केंद्रीय दूरसंचार मंत्री आदरणीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज 24 वर्षांनंतर दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी BSNL ने आपला लोगो, स्लोगन आणि नवीन 7 सेवा लॉन्च केल्या.
कंपनीने आपल्या नवीन लोगो हा वर्तुळाकार आणि त्यात भारताचा नकाशा जोडला आहे. कंपनीने आपल्या जुन्या घोषणावाक्यात बदल केला आहे. आधी "Connecting India" (कनेक्टिंग इंडिया) असे होत त्यात बदल करून आता "Connecting Bharat" (कनेक्टिंग भारत) करण्यात आले आहे.
त्यासोबतच BSNL ने नवीन सर्विसेस पण ग्राहकांसाठी खुल्या केल्या: स्पॅम फ्री नेटवर्क, नॅशनल वाय-फाय रोमिंग, BSNL IFTV, ATS कियोस्क, D2D सेवा, आपत्ती प्रतिसाद सेवा, खाणींसाठी खाजगी 4G नेटवर्क सुरू केल्या आहेत.
लोगो आणि स्लोगनमध्ये केलेले नवीन बदल
बीएसएनएल (BSNL) ने तब्बल २४ वर्षानंतर त्याच्या जुन्या लोगोमध्ये बदल केला आहे. जुन्या लोगोमध्ये असलेल्या निळ्या आणि लाल बाणांच्या रंग बदलून आता त्या जागी पांढरा आणि हिरवा रंग केला आहे. वर्तुळाचा रंग बदलून केशरी करण्यात आला असून वर्तुळात भारताचा नकाशाही जोडण्यात आला आहे.
त्यामुळे लोगो हा खूप उठून आणि छान दिसायला लागला आहे. त्या सोबतच जुन्या घोषणावाक्याच्या जागी आता नवीन घोषणावाक्य तयार केले आहे. "Connecting India" ला बदलून "Connecting Bharat" असे ठेवण्यात आले आहे.
BSNL च्या नवीन 7 सेवांविषयी
BSNL कंपनीसाठी आज सोन्याचा दिवस आहे. कारण कंपनीने ग्राहकांसाठी ज्या प्रकारे सेवा चालू केल्या आहेत, ते पाहता कंपनीचे दिवस खूप लवकर बदलतील.
भारताचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दिल्लीतून भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL कंपनीच्या सात नवीन सेवांचा शुभारंभ केला. BSNL आपल्या ग्राहकांसाठी काय नवीन घेऊन येतेय, पाहू या.
1. स्पॅम-फ्री नेटवर्क (spam-free network) :- BSNL आपल्या ग्राहकांसाठी स्पॅम कॉल्स (Spam Calls) आणि स्पॅम संदेश (Spam SMS) पासून मुक्त करण्याचा मार्ग शोधून आणला आहे. BSNL आधीच AI चा वापर करून नेटवर्क स्तरावर स्पॅम कॉल आणि संदेश (SMS) ब्लॉक करेल.
त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. सध्या भारतात खूप प्रमाणात लोकांची फसवणूक होताना आपण पाहतो.
2. हाय-स्पीड इंटरनेट :- BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी FTTH (फायबर-टू-द-होम) राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय देशभरात हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करू शकाल.
3. BSNL IFTV - FTTH :- फायबर-आधारित इंट्रानेट चा वापर करून BSNL आपल्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे ५०० हुन अधिक चॅनेल.
4. डायरेक्ट टू डिव्हाईस (D2D) सेवा :- BSNL ने उपग्रह आणि स्थलीय मोबाईल नेटवर्क एकत्र करून आपल्या ग्राहकांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटीची घोषणा केली आहे. डायरेक्ट-टू-डिव्हाइस (D2D) सेवेमुळे ग्राहकांना संदेश पाठवता येईल आणि UPI पेमेंट करता येईल. यात ग्राहकांना नेटवर्कची समस्या येणार नाही, आणि ग्राहक या सेवांचा वापर करू शकतात.
5. ATS (Any Time SIM) Kiosk (एटीएस किओस्क) :- ग्राहकांसाठी सिम घेणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही नजीकच्या ATS (Any Time SIM) Kiosk ला 24/7 कधीही भेट देऊन तुमची ई-केवायसी पूर्ण करून नवीन सिम विकत घेऊ शकता. त्यासोबतच ग्राहक आता अपग्रेड आणि पोर्ट सारख्या सुविधांचा पण आनंद घेऊ शकतात.
6. डिजास्टर रिस्पॉन्स सर्व्हिस (Disaster Response Service) :- नैसर्गिक, मानवनिर्मित किंवा तांत्रिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाला कमी करण्यासाठी आणि अशा भागांमध्ये प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ही सेवा कार्य करणार आहे.
यामुळे आपत्कालीन भागांमध्ये मदत पुरवणे, नुकसान झालेल्या लोकांच्या दैनंदिन जीवनाला स्थिर करणे, बचावकार्य करणे आवश्यक त्या उपाययोजनांसाठी याचा वापर केला जाईल.
7. कोळसा खाणींसाठी खाजगी 5G नेटवर्क :- भारतात कोळसा खाणी असो की दुसऱ्या कोणत्याही खाणी. अशा ठिकाणी नेटवर्क सेवा ह्या कमकुवत पाहायला मिळतात किंवा नसतातही. म्हणून BSNL अशा जागांसाठी खाजगी 5G नेटवर्क चालू केले आहे.
BSNL हा C-DAC च्या मदतीने AI आणि IoT चा वापर करणार आहे. जेणे करून अशा खाणींमध्ये हाय स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्क प्रदान करेल. जमिनीखालच्या आणि मोठ्या खुल्या खाणींसाठी हे पहिले 5G नेटवर्क असेल, असे BSNL ने सांगितले आहे.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping Click here