Home  |  शेत-शिवार बातम्या: लिंबाच्या झाडांना जास्त लिंबू लागण्यासाठी १००% परिणामकारक फॉर्म्युला

शेत-शिवार बातम्या: लिंबाच्या झाडांना जास्त लिंबू लागण्यासाठी १००% परिणामकारक फॉर्म्युला

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

लिंबू फळबागेचे खत नियोजन

बागेतील प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणात खत आणि पोषण दिले गेले पाहिजे. तुम्ही यासाठी दर ३ ते ४ महिन्यांनी चांगल्या दर्जाचे कुंजलेले शेणखत वापरा. कुंजलेल्या शेणखतात झाडाला लागणारे पोषणतत्त्व असतात. त्याने बागेतील झाडांना नक्की फायदा पाहायला मिळेल.

झाडाला फळे लागण्यापूर्वी एनपीके (१०:२६:२६) खत हे १०० ते १५० ग्रॅम लिंबू बागेतील प्रत्येक झाडाला टाका. त्यानंतर १५ दिवसांतून एकदा झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बागेत त्याची फवारणी करावी. त्यानंतर डीएपी आणि पोटॅश दोन्ही झाडांना टाका. त्यांचे प्रमाण साधारण ५०-१०० ग्रॅम डीएपी घ्या आणि ५० ग्रॅम पोटॅश प्रति झाड प्रमाणे घ्या. अशा सोप्या पद्धतीने खत नियोजन केले असता, झाडांना फळ लागण्याचे प्रमाण टिकून राहील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लिंबू बागेसाठी पाण्याचे नियोजन

लिंबू हे काही भागांमध्ये वर्षभर घेतले जातात. लिंबू हंगाम हा फेब्रुवारीपासून चालू होतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झाडांवर फुलधारणा होते. या काळात झाडांना योग्य पाणी नियोजन महत्वाचे आहे. कारण राज्यात फेब्रुवारीपासून उन्हाची चाहूल लागण्यास सुरुवात होते. आणि काही भागांमध्ये पाणीटंचाईचे सावटही येते.

म्हणून शेतकऱ्यांनी बागेत वर्षभर पुरेल इतका पाणी साठा करून ठेवायला पाहिजे. उन्हाळ्यात बागेत ४ ते ५ दिवसांतून एकदा पाणी दिले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे हिवाळ्यात ७ ते १० दिवसांतून एकदा पाणी दिले गेले पाहिजे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असतो आणि सकाळच्या ओसांमुळे दिवसभर जास्त गर्मी जाणवत नाही. म्हणून हिवाळ्यात पाणी ४ ते ५ दिवस उशिराने दिले तरी चालत.

पण शेतकरी बांधवांनो, फुलं आणि फळे येण्याच्या वेळेस हलगर्जीपण टाळा आणि बागेला योग्य पाण्याचे नियोजन करा. या दिवसांमध्ये पाण्याची कमतरता भासता कामा नाही. नाहीतर याचा परिणाम हा थेट तुमच्या उत्पन्नावर दिसेल.


बागेतील लिंबू झाड छाटणीसाठी योग्य नियोजन

बागेतील झाड जितके हवेशीर आणि प्रकाशयुक्त असेल तितके झाडाला फळही लागतात. झाड हे वर्षानुवर्ष फळ देत राहते. आणि झाडाचं वय सुद्धा वाढत जातं. त्यामुळे झाडाच्या वयानुसार त्यांची फळ लागण्याची क्षमता कमी होत जाते, म्हणून झाडाच्या जुन्या फांद्या, सुकलेल्या फांद्या, कमकुवत म्हणजे कमजोर फांद्या आणि आत वाढणाऱ्या फांद्या काढून टाका.

आत वाढणाऱ्या फांद्या झाडाला दाट करतात. त्यात हवा आणि सूर्यकिरण पोहचू शकत नाही, त्यामुळे फळांना योग्य हवा आणि सूर्यप्रकाश मिळणार नाही. कदाचित फळे गळूही शकतात. म्हणून अशा सर्व फांद्या छाटून घ्यायला हव्यात. वरती सांगितल्या प्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बहार येण्यास सुरुवात होते. म्हणून त्याअगोदर जर झाडांची हलकी छाटणी केली तर झाडावर नवीन फुलांची आणि फळांची संख्या वाढताना दिसेल.


लिंबाच्या झाडावरील फुलं आणि फळं गळण्यापासून वाचवण्यासाठीचे नियोजन

बागेतील फुलं आणि फळं गळत असतील तर हे चिंता करण्यासारखे आहे. यावर योग्य वेळी उपाय आणि नियोजन केले नाही तर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल. राज्यात प्रत्येक दिवशी वातावरणात बदल होताना पाहिला जातो. अशातच फुलं आणि फळं येण्याच्या वेळेस हवामानात बदल झाला तर नुकसान होऊ शकते.

असे होऊ नये म्हणून झाडाला फुल लागण्यापूर्वी २ ग्रॅम बोरॅक्स घ्या आणि त्याला प्रति लिटर पाण्यात मिसळून योग्य पद्धतीने मिश्रण करून झाडांवर फवारणी करा. यामुळे फुलं गळण्याचे प्रमाण कमी होईल. त्याच प्रमाणे झाडाची पाने पिवळी पडत असतील तर त्यासाठी तुम्ही ५ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट हे प्रति लिटर पाण्यात मिसळून बागेतील झाडांवर फवारणी करा. यामुळे तुमचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होईल.


झाडांवरील कीड आणि रोग नियंत्रण नियोजन

बाग आणि झाड म्हंटल म्हणजे संकट येतील, संकट कोणत्या प्रकारे येतील ते सांगता येत नाही. काही अतिदृष्टी होऊ शकते, तर दुष्काळही पळू शकतो, किंवा झाडावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा पाहायला मिळू शकतो. यावर उपाय आणि योग्य नियोजन करायला आहे.

जर तुमच्या बागेवर तेल्या आणि मावा किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असेल तर तुम्ही ५ मिली/लिटर निंबोळी तेल झाडावर फवारा. किंवा झाडांना वाळवी आणि मुळांच्या समस्या दिसत असतील तर २ मिली/लिटर क्लोरोपायरीफॉस पाण्यात मिसळून झाडांच्या मुळांना द्या.

किंवा झाडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर यासाठी ३ ग्रॅम प्रति लिटर कॉपर ऑक्सीक्लोराइड मिसळून बागेतील प्रत्येक झाडावर फवारणी करा. जेणेकरून तुमची फळ बाग कीड आणि रोग मुक्त राहील आणि तुम्हाला बागेमधून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल.

काही खास टिप्स ज्यामुळे झाडांना भरपूर फळे लागतील

झाड मोठे झाले की ते स्वतः जमिनीमधून पोषणतत्त्व शोधत राहते. म्हणून झाडाला पाण्याचे प्रमाण कमी ठेवा. फक्त पाणी नियोजन पद्धतीने द्या. जास्त पाणी दिल्याने झाड हिरवे होईल, फुलं आणि फळं जास्त लागणार नाहीत. त्यामुळे झाडाला कमी पाणी द्या, जेणेकरून झाडाला ताण येईल.

आणि अधिक फुलं लागतील. झाडाला जितक्या जास्त प्रमाणात पोटॅश आणि सल्फर मिळेल, तितके अधिक बागेतील झाडांवर फुलं आणि फळांची संख्या जास्त पाहायला मिळेल. वरील सर्व उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने केले आणि तुमच्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता.

शेतकरी बांधवांनो, वरील माहितीविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला यात काही समजत नसेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या कृषी विभागात संपर्क करून योग्य मार्गदर्शन घेऊ शकता.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra heavy rain alert 2025

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: गडचिरोली, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट

Gay gotha anudan yojana 2025 maharashtra

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: गाय गोठा बांधणीसाठी मिळणार ३ लाखांचं अनुदान!

Itkapalle brothers banana farming success story

पारंपारिक शेतीला फाटा, केळी लागवडीतून 28 लाखांचा नफा: इटकापल्ले बंधूंची यशोगाथा

Maharashtra rain alert august 2025

महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह सरी, उकाडा कायम