Monday, 23 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय

महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिंदखेडा मतदारसंघाची रचना.

2008 पासून शिंदखेडा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे, यात धुळे जिल्ह्यातील संपूर्ण शिंदखेडा तालुका आणि साक्री तालुक्यातील दुसाने महसूल मंडळाचा समावेश आहे. शिंदखेडा मतदारसंघ हा धुळे लोकसभा क्षेत्राच्या मतदारसंघाचा एक महत्त्वाचा विशेष भाग आहे.

शिंदखेडा मतदारसंघ हा विविध सामाजिक आणि आर्थिक घटकांनी समृद्ध आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिंदखेडा मतदारसंघात 3,41,008 नोंदणीकृत मतदार आहेत. यात 1,73,446 पुरुष तर 1,67,562 महिला आहेत.

पाणीदार आमदार श्री जयकुमार भाऊ रावल: प्रभावशाली नेतृत्व

पाणीदार आमदार श्री जयकुमार भाऊ रावल अनेक वर्षांपासून शिंदखेड्यातील शेतकरी, मोलमजुरी, गरीब आणि गरजू लोकांसाठी झटणारे एक कर्तव्यनिष्ठ नेते आहेत. त्यांचे त्यांच्या मतदारसंघात जनतेशी असलेले सखोल नाते, जनतेसाठी केलेली विकासकामे आणि त्यांची लोकप्रियता ही मुख्य कारणे आहेत.

प्रचाराची रणनीती

2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी जयकुमार भाऊ रावल यांनी शिंदखेड्यात अत्यंत जवळून म्हणजे घरोघरी जाऊन प्रचार मोहीम उभारली. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या येणाऱ्या पंचवार्षिकात कशा सोडवल्या जातील यासाठी स्थानिक नेत्यांसोबत बसून आपली योजना मांडली.

त्यांच्या सभांना जनतेने खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली, त्यामुळे पाचव्यांदा त्यांचा ऐतिहासिक विजय झाला.

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि विकासकामे

2009 पासून शिंदखेडा मतदार संघाचा कायापालट झालाय, अनेक महत्त्वाच्या विकासकामांची अंमलबजावणी झाली. पाणीपुरवठा योजना, रस्त्यांचे जाळे, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील सुधारणा हे त्यांचे महत्त्वाचे कामे आहेत, त्यांनी ते पूर्णही केले.

त्यांच्या या विकासकामांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या लोकप्रियतेवर पडला आहे आणि त्यांना निवडणुकीत त्याचा फायदा झाला. जून 2024 मध्ये चालू करणाऱ्या आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (mukhyamantri mazi ladki bahin yojana) योजनेचा ही त्यांना भरपूर फायदा झाला आहे. जयकुमार भाऊ यांना लाडक्या बहिणीचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

विरोधकांवर जबरदस्त मात.

जयकुमार भाऊ रावल यांचा 2024 चा विजय हा खूप महत्वाचा विजय मानला जातो. अनेक दिग्गज, पक्षामधून फुटून विरोधांसोबत हातमिळवणी करून ताकदवान विरोधकांना नमवून मिळवलेला हा विजय आहे. भाऊंचा आत्मविश्वास, शांत संयम, स्वभाव, आणि दमदार प्रखर नेतृत्व यामुळे विरोधकांची समीकरणे भाऊंनी या विधानसभेत बिघळवली आणि ऐतिहासिक विजय मिळवला.

लोकशाहीचा विजय आणि मतदारसंघाची पुढील वाटचाल

2024 शिंदखेडा विधानसभा निकाल हा ऐतिहासिक निकाल आहे. भाऊंचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयानंतर मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी त्यांच्या विकासकामांच्या पुस्तकात दाखवलेल्या प्रकल्पांना गती द्यावी हीच सर्वसामान्य जनतेची आशा आहे.

जयकुमार भाऊ रावल यांचे महत्त्वाचे प्रकल्प

1. सुलवाडे जामफळ योजना.

2. पीडीएन योजना. (५४ गावांच्या थेट शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी)

3. वाडी शेवाडी पीडीएन योजना (९ गावांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी)

4. प्रकाशा बुराई योजना

5. वॉटर ग्रीड योजना (८५ गावांची तहान भागवणारी योजना)

6. दोंडाईचा ते सोनगीर फाटा काँक्रिटीकरण रस्ता

7. काँक्रिटीकरण रस्ता (नंदाने - मुकटी ते वाडी - रेवाडी - देवी - सतारे ते कर्ले या ३४ किलोमीटर रस्त्याचा)

8. दोंडाईचा शहरात अमरावती नदीवर पूल.

निष्कर्ष

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जयकुमार भाऊ रावल यांचा 2024 मधील विजय हा मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या विजयानंतर शिंदखेडा हा भाजपचा बालेकिल्ला अजून अधिक मजबूत झाला आहे. भाऊंच्या कार्यक्षम नेतृत्वाने जनतेचा विश्वास मिळवला हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Coming Soon on Krushi Marathi.

India’s Largest Agri Marketplace for Sellers, Buyers & Customers

BUY, SELL & RENT Agriculture — All in One Place.