सरकारी गुंतवणूक योजना: सुरक्षित आणि लाभदायक पर्याय
सध्या आपण देशात पाहत आहोत, बँकेत असलेला पैसा सुद्धा सुरक्षित नाही. आणि आपण आपल्या पैशांवर अधिक पैसा मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो, आणि अशातच आपण मित्राच्या सांगण्यावरून किंवा शेजारील मित्राच्या सांगण्यावरून पैसे इन्व्हेस्ट करतो, पण त्यात काही गॅरंटी नसते.
ज्या लोकांना पैसे कमवायचे आहेत पण ०% जोखीम घ्यायची आहे, अशा लोकांसाठी केंद्र सरकार घेऊन आले आहे भन्नाट योजना. या योजनेत तोटा नाही, फक्त नफा. तुम्ही या योजनेमधून निवृत्ती पायांत म्हणजे वयाच्या ६० वर्षांपर्यंत २ कोटी २६ लाख रुपये जमा करू शकता. ते तुमच्या पुढील भविष्यासाठी कामात येतील.
आता लोक सांगतील, ६० वर्ष कोण जिवंत राहणार आहे. मजा मारून घ्यायची कुठे बचतीच्या मागे लागायचं. तुमचं खरं आहे, पण कदाचित तुम्ही ६०-७० वर्ष जगाल, आणि कालांतराने तुम्हाला दवाखान्याची गरज लागली तर तुम्ही कमावलेले पैसे केव्हा संपतील, ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही.
म्हणून लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची, जेणेकरून तुमच्या भविष्यात ती तुम्हाला उपयोगात येईल. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षीपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर ६० व्या वर्षी तुमच्या बँक खात्यात २ कोटींहून अधिक रक्कम असू शकते. या योजनेचे नाव आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund).
SIP पेक्षा सुरक्षित गुंतवणूक पर्याय
एसआयपी (SIP) या मध्ये गुंतवणूक करून कोट्यधीश बनता येते कारण असे मानले जाते की Systematic Investment Plans (SIP) दीर्घकाळानंतर चांगला परतावा देते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, SIP ही बाजाराशी संबंधित आहे. त्यामुळे यात निश्चित परताव्याची खात्री कोणच देणार नाही. येतील तर तुम्ही करोडपती बनू शकता, नाहीतर जेवढी रक्कम जमा केली आहे त्यामधून सुद्धा वजा करून रक्कम तुम्हाला मिळेल.
PPF ही जोखीममुक्त आणि हमीशीर परताव्याची योजना आहे. ही सरकारी योजना असल्याने तुम्हाला फिक्स परतावा मिळणार आहे, त्यासोबत टॅक्समध्ये सुद्धा सूट मिळणार आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) मध्ये तुम्ही नफ्यात असो की तोट्यात, तुम्हाला टॅक्स हा भरावाच लागणार आहे. या योजनेत तुम्हाला ८०C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत आणि टॅक्स माफ असणार आहे.
PPF मधून २ कोटीपेक्षा जास्तचा फंड कसा बनेल?
✅ PPF (Public Provident Fund) योजना १५ वर्ष चालणारी दीर्घकालीन केंद्र सरकारची देशातील सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी तयार केलेली योजना आहे.
✅ १५ वर्षांत मॅच्युअर झाल्यानंतर योजनेला पुढे चालू ठेवण्यासाठी ५ वर्षांचा स्लॉट निवडावा लागतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्या स्लॉटला वाढवू शकता.
✅ २ कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी तुम्हाला १५ वर्षानंतर ५-५ वर्षांचे ४ स्लॉट बनवावे लागतील, म्हणजे ४ वेळा PPF वाढवावी लागेल.
✅ आता जी योजना १५ वर्षांत मॅच्युअर होणार होती, ती आता पुढील ३५ वर्षांसाठी चालवू शकता.
✅ योजनेत पैसे गुंतवणुकीवर सरकारने अट ठेवली आहे. तुम्ही वर्षाला १ लाख ५० हजार रुपये जमा करू शकता.
✅ तुम्ही योजनेत पुढील ३५ वर्षांसाठी दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक करत गेलात, तर तुमचा हमखास २ कोटी रुपयांचा जास्त फंड तयार होईल आणि ते सुद्धा टॅक्स फ्री.
✅ सध्या केंद्र सरकार या योजनेवर ७.१% वार्षिक व्याज देत आहे. हे व्याज कमी-जास्त होत राहते.
PPF मध्ये २ कोटी रुपयांचा फंड कसा उभारू शकता?
✅ मोठा फंड उभारायचा असेल तर वयाच्या २५ व्या वर्षापासून तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक सुरु करा आणि वर्षाला १ लाख रुपये गुंतवा.
✅ ३५ वर्षानंतर PPF मध्ये तुमची गुंतवणूक ही ५२,५०,००० रुपये असेल.
✅ ७.१% दराने व्याज धरले तरी ३५ वर्षानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेवर १,७४,४७,८५७ रुपये इतके व्याज मिळेल आणि ते तुमच्या PPF च्या खात्यात जमा होईल.
✅ या योजनेत मिळणारे व्याज हे मुद्दल रकमेत जमा केले जाते आणि पुढील वर्षी मुद्दल आणि व्याज या दोघांवर व्याज मिळते.
✅ यामुळे तुमच्या PPF खात्यात एकूण मॅच्युरिटी रक्कम २,२६,९७,८५७ रुपये जमा होईल. अशा प्रकारे तुम्ही २ कोटी २६ लाख रुपयांचा फंड उभारू शकता.
PPF मध्ये ५ वर्षांची मुदतवाढ कशी मिळते
✅ तुमचे PPF खाते ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असते, तिथे जाऊन मुदतवाढीसाठी अर्ज जमा करावा लागतो.
✅ मुदतवाढीचा अर्ज मॅच्युरिटी संपण्याच्या १ वर्ष आधी जमा करावा लागतो.
✅ जर वेळेवर अर्ज जमा केला गेला नाही, तर तुम्हाला या योजनेत पुढे गुंतवणूक करता येणार नाही.
PPF चा टॅक्समध्ये मिळणाऱ्या सवलती
✔️ या योजनेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त असते. त्यामधील ठेवीवर कोणत्याही प्रकारचे कर भरावे लागत नाही.
✔️ योजनेतील मुद्दलावर मिळणारे व्याज उत्पन्नसुद्धा करमुक्त असते.
✔️ त्यानंतर तुम्हाला जेव्हा मॅच्युरिटी रक्कम मिळेल, ती सुद्धा पूर्णपणे करमुक्त असणार आहे.