Tuesday, 29 April 2025
English   हिंदी
Home  |  Skin Care Tips In Holi: होळीपूर्वी त्वचेची काळजी घ्या, हे सोपे उपाय करा आणि त्वचेला होणारे नुकसान टाळा

Skin Care Tips In Holi: होळीपूर्वी त्वचेची काळजी घ्या, हे सोपे उपाय करा आणि त्वचेला होणारे नुकसान टाळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर लावा या गोष्टी | Apply these things on your face on Holi

होळी (रंगपंचमी) खेळण्याआधी घरून निघताना तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काही विशिष्ट घरगुती गोष्टी लावल्या पाहिजेत. यामुळे होळी खेळताना रंग (Color) तुमच्या त्वचेला (Skin) चिकटणार नाहीत आणि तुमच्या त्वचेच्या स्वरक्षणासाठी एक थर त्वचेवर तयार होईल.

यामुळे तुम्ही होळीची (Holi) मजा आनंदात घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या त्वचेच्या नुकसानीचीही चिंता राहणार नाही आणि आतून तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही. चला मग जाणून घेऊया ते घरगुती प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या दिवशी घरातून बाहेर पळताना तुमच्या त्वचेवर लावू शकता.

१. नारळ तेल (Coconut Oil)

नैसर्गिक उपाय म्हणून आपण नारळ तेल चेहरा आणि संपूर्ण शरीरावर लावू शकता. नारळ तेल रंगांना तुमच्या त्वचेवर चिकटू देणार नाही आणि त्यासोबत त्वचेत रंग मुरू देणार नाही.

हे तेल तुमच्या त्वचेवर एक थर तयार करतो आणि रंगांपासून संरक्षण तर करतोच पण नारळ तेलात व्हिटॅमिन E असल्याने त्वचेसाठी सुद्धा उत्तम असते. नारळ तेल तुमच्या त्वचेला हायड्रेट करते. रंगांमधील केमिकल्समुळे त्वचेवर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

२. वेसलीन (पेट्रोलियम जेली)

तुमच्या ओठांची, डोळ्यांची म्हणजे डोळ्यांच्या आजूबाजूला आणि नाकाच्या आतील आणि वरील बाजूस वेसलीनचा वापर केला जातो. हे शरीराच्या नाजूक भागांचे रंगांपासून संरक्षण करतात. यामुळे अशा भागातील त्वचेवर रंग लागल्यानंतर होणाऱ्या जळजळ, खाज आणि सुजाण होण्यापासून टाळते आणि आपल्या त्वचेचे संरक्षण करते. म्हणून होळीच्या आणि रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही वेसलीन लावून आनंद घेऊ शकता.

३. अॅलोवेरा जेल (Aloe vera gel)

होळीमध्ये रासायनिक रंग खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे रंगांमधील रसायनांमुळे आपल्या त्वचेला मोठे नुकसान होऊ शकते. अ‍ॅलोवेरा जेल हा आपल्या त्वचेसाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणायला हरकत नाही.

कारण अॅलोवेरा मध्ये मुख्यतः अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी सारखे हायड्रेटिंग गुणधर्म आढळतात. जेल त्वचाचे पोषण करून त्यांना निरोगी आणि संरक्षित ठेवतात. त्यामुळे घरातून बाहेर निघताना ३० मिनिटं आधी अ‍ॅलोवेरा जेलचा वापर करू शकतो.

४. सनस्क्रीन (Sunscreen)

देशात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. आणि सकाळच्या ९-१० वाजेपासून उन्हाचे चटके आपल्या शरीराला लागणे चालू होतात. होळी खेळण्यासाठी आपण घरातून बाहेर निघू आणि आपल्या त्वचेचे संरक्षण हे रंगांसोबत सूर्याच्या हानिकारक किरणांपासून करण्यासाठी आपल्या कोमल त्वचेवर आठवणीने सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. यामुळे होळी खेळताना आपली त्वचा सुरक्षित राहण्यास मदत होईल.

५. मॉइश्चरायझर (Moisturizer)

मित्रांनो, होळीच्या दिवशी आपल्या त्वचेवर इतर दिवसांपेक्षा जास्त मॉइस्चरायझर लावा. यामुळे आपल्या त्वचेवर एक थर तयार होईल. हा थर आपल्या त्वचेमध्ये पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतो आणि आपली त्वचा कोरडी होऊ देत नाही. हा थर आपल्या त्वचेला होळीच्या रंगांपासून वाचवतो.

मॉइश्चरायझरचा थर आपल्या त्वचेला बाहेरील धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो आणि आपल्या त्वचेला निरोगी, हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो. म्हणून तुम्ही घरातून बाहेर निघताना मॉइश्चरायझर (Moisturizer) चा सुद्धा वापर करू शकता.

६. जैतून तेल (ऑलिव ऑयल) (Olive Oil)

तुमच्या घरी आणि तुमच्या जवळ नारळ तेल उपलब्ध नसेल, तर त्याला पर्यायी मार्ग म्हणून जैतून तेलचा वापर करू शकता. जैतून तेल तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझ करते आणि होळीच्या रासायनिक रंगांपासून संरक्षित करते,

कारण जैतून तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E असतात. ते आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात आणि त्वचेचा कोरडेपणा टाळतात. त्वचेत जास्त रंग शोषला जात नाही आणि नंतर रंग काढायला सोपे जाते.

७. जैतून तेल (ऑलिव ऑयल) आणि मध (Olive Oil & Honey)

रंग आपल्या त्वचेवर पडल्यानंतर तो आपल्या त्वचेवर चिटकून मध्ये जातो. अशा रासायनिक रंगांपासून त्वचेला वाचवण्यासाठी होळीच्या दिवशी जैतून तेल आणि मधचा वापर करू शकतो. या दोघांना मिश्र करून त्वचेवर लावावे.

त्वचेवर होणाऱ्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्याचं काम मध करते. आणि जैतून तेल हे आपल्या त्वचेचा कोरडेपणा दूर करतो. रंग त्वचेत खोलवर जिरू देत नाही. रंग काढताना हे मिश्रण त्वचेचा रंग लगेच काढतो पण आपल्या त्वचेला मऊ आणि निरोगी ठेवतो.

८. ग्लिसरीन (Glycerin)

तुम्ही रोजच्या वापरामध्ये ग्लिसरीनचा उपयोग करत असाल तर तुम्ही होळीच्या दिवशी रंगांपासून वाचण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करू शकता. ग्लिसरीन तुमच्या त्वचेला मऊ ठेवण्याचे काम करेल आणि रासायनिक रंगांपासून होणाऱ्या हानीपासून त्वचेला वाचवू शकता.

९. व्हिटॅमिन ई ऑयल (Vitamin E Oil)

व्हिटॅमिन ई तेल लावण्याने होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांपासून होणाऱ्या जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट असते आणि ते अँटीऑक्सिडंट रासायनिक रंगांपासून त्वचेचे संरक्षण करतात.

निष्कर्ष:

आनंदात आणि सुरक्षित होळी साजरा करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय वापरू शकता. यांचा काही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही. ज्या लोकांना त्वचेच्या समस्या असतील त्यांनी त्यांच्या डॉक्टरांसोबत बातचीत करूनच उपाय करावा.

या होळीमध्ये तुमच्या त्वचेला रासायनिक रंगांपासून वाचवण्यासाठी योग्य लोकजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला वरील टिप्स आवडले असतील तर त्यांना फॉलो करू शकता. आणि शेवटी फक्त इतकेच "होळीच्या अनेक शुभेच्छा" (Wish you many many Happy Holi)

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet