कधी विचार केलाय का? फवारणी पंपाची बॅटरी सारखी खराब का होते?

फवारणी पंपाची बॅटरी खराब होण्याची काही मुख्य कारणे

१. कधी कधी आपण फवारणी पंपाची बॅटरी चुकीच्या पद्धतीने चार्ज करतो.

२. स्प्रे पंपाची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच चार्ज करत नाही.

३. कधी कधी आपण बॅटरी घाई गडबडीत १-२ तास चार्ज करून काढून घेतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे.

४. कधी कधी आपण बॅटरी चार्ज करण्यासाठी ठेवतो आणि ओव्हरचार्ज होते, म्हणजे (१० ते १२ तासांपेक्षा जास्त वेळ बॅटरी चार्ज लावलेली असते). असे केल्यास बॅटरी लवकर फुगते.

५. आपण कधी कधी पंपाला चुकीचा चार्जर लावतो आणि त्याने बॅटरी चार्ज करतो. असे केल्यास बॅटरी खराब होते.

६. जास्त उष्णता असलेल्या जागी किंवा उन्हात ठेवल्याने बॅटरी खराब होऊ शकते.

७. फवारणी पंप चार्जिंग करताना उन्हात ठेवणं.

८. फवारणी झाल्या नंतर पंप उन्हात किंवा ओलसर जागी ठेवणं सुद्धा बॅटरी खराब होण्याच कारण बनू शकते.

९. बॅटरीवर चुकून पाणी पडल्यास आतल्या आत शॉर्टसर्किट होऊ शकतो आणि बॅटरी खराब होऊ शकते.

१०. जास्त वजनदार आणि लोकल कंपनीचा पंप वापरणे.

११. अनेकदा आपण स्वस्त पंप विकत घेतो त्या पंप तयार करणारी पंपमध्ये लो दर्जाची बॅटरी टाकून ग्राहकांना पंप विकतात.

१२. कधी कधी पंपच्या मोटरची क्षमता जास्त असते आणि पण बॅटरी लहान असते यामुळे ओव्हरलोड होऊन बॅटरी खराब होते.

१३. पंपची बॅटरी सतत पूर्ण discharge होऊ देणे. या मुळे सुद्धा बॅटरी खराब होते.

१४. बॅटरी पूर्णपणे संपल्यानंतर काही शेतकरी २–३ दिवस चार्जच करत नाहीत त्यामुळे सुद्धा बॅटरी खराब होते.

१५. एकदा बॅटरी खराब झाली की तुम्ही तिला कितीही वेळेस चार्जे करा तरी ती चालत नाही.

१६. काही वेळेस फवारणी करताना आपले लक्ष्य नसते आणि फवारणी औषध बॅटरीवर सांडले जाते. त्यामुळे बॅटरीवर गंज निर्माण होतो, वायरिंग खराब होते आणि बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होते.

फवारणी पंपाच्या बॅटरीची काळजी कशी घ्यावी?

१. प्रत्येक वेळी फवारणी पंप वापरल्यानंतर पंपाला चार्ज करा.

२. तुम्ही रात्री चार्जिंग लावत असणार तर ६ ते ८ तासाचा वेळ लावून पंप चार्ज करावा.

३. बॅटरी व पंप नेहमी स्वच्छ, थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावा.

४. पंप सोबत मिळालेले ओरिजनल चार्जरचा वापरा करावा.

५. महिन्यातून एकदा फवारणी पंपाची बॅटरी फुल discharge होण्याआधीच पूर्ण चार्ज करा.

६. वेळोवेळी किंवा फवारणी करण्यासाठी जाताना आधी वायरिंग/स्विच तपासत रहा, शंका वाटत असेल किंवा शॉर्ट झालेले दिसत असेल तर लगेच बदला.

फवारणी पंप खरेदी करताना काय बघावं?

१. नामांकित आणि गॅरंटी असलेला फवारणी पंप निवडावा.

२. फवारणी पंपाची बॅटरीची क्षमता किमान 12V/8Ah किंवा त्याहून जास्त हवी.

३. फवारणी पंप हा चार्ज झाल्या नंतर ऑटो कट असलेला चार्जर घ्या.

४. पंप वजनदार, ब्रँडेड लिथियम-आयन बॅटरी (Branded lithium-ion battery) पंप चांगला असतो.

५. सरकारी योजनांचा लाभ घ्या. आणि एक उत्तम फवारणी पंप विकत घ्यावा.

निष्कर्ष:

फवारणी पंपाची बॅटरी खराब नसते तर आपला वापर चुकीचा असतो. आपल्या जवळ त्याला हाताळण्याचे आणि चार्ज करण्याविषयी अपूर्ण माहिती, फवारणी पंपाच्या बॅटरीची योग्य काळजी घेतली तर २ ते २. वर्ष हमखास टिकेल. तुम्ही पंपाची योग्य काळजी घेतली नाही तर तुमचा वेळ पैसा आणि मेहनत सर्व वाया जाईल.