BHIM 3.0 UPI इतका चर्चेत का आहे?
मागील काही दिवसांपासून, किंबहुना गेल्या आठवड्यापासून Unified Payments Interface (UPI) चर्चेत आहे. त्याचे तसे कारण सुद्धा आहे. भारतात UPI चा वापर वाढावा यासाठी आपण पाहतो की देशातील लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर प्रोत्साहन योजनेमुळे तर देशात १ एप्रिलपासून UPI विषयी लागू होत असलेले नवीन नियम,
जसे निवडक मोबाईल क्रमांकांवर UPI सेवा बंद करण्याच्या निर्णयामुळे. आजच्या काळात UPI हे पेमेंटसाठी सर्वात सोयीचे आणि आवडीचे एक सुलभ साधन बनले आहे. फक्त आपल्या बँक खात्यात पैसे आणि हातात स्मार्ट मोबाईल असला की ऑनलाईन व्यवहार सहज होतो.
आज आपण भारत सरकारच्या UPI च्या सर्वात महत्त्वाच्या अॅपबद्दल भारत इंटरफेस फॉर मनी (Bharat Interface for Money) विषयी पाहणार आहोत. कारण BHIM UPI हे एक सरकारी अँप आहे. ते आता अधिक सुलभ आणि प्रगत झाले आहे. NPCI ने भारतात BHIM 3.0 लाँच केले असून, 2016 नंतरच्या अँपमध्ये हे ३ सर्वात मोठे अपडेट आहे. चला पाहूया, काय विशेष आहे या अपडेटमध्ये.
वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स
BHIM 3.0 मध्ये NPCI मार्फत वापरकर्त्यांसाठी नवीन खास वैशिष्ट्ये सुविधा समाविष्ट करण्यात आले आहेत, त्या सुविधा आतापर्यंत फक्त खासगी अॅप्समार्फत उपलब्ध केले जात होत्या.
✅ खर्चाचे वाटप (Split expenses): आता मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बिल भरण्यावरून वाद होणार नाही आणि रूम भाडे त्यासोबत रूममधील इतर खर्च कॅल्क्युलेटरची झंझट नाही. BHIM 3.0 मध्ये नवीन फीचर जोडण्यात आले आहे. हे फीचर तुमच्या खर्चाची विभागणी करून देईल.
✅ कुटुंब मोड (Family mode): हे फीचर खाजगी अँप्समध्ये पाहिले गेले आहे. त्या फीचरला खाजगी ॲप्समध्ये "UPI Circle" या नावाने ओळखले जाते. आता ते BHIM 3.0 मध्ये येणार आहे. याच्या मदतीने वापरकर्ता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना (आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा) स्वतःच्या खात्यात जोडू शकतील. त्यांना जोडल्यानंतर ते तुमच्या बँक खात्याचा वापर करून UPI पेमेन्ट करतील. त्यासाठी तुम्ही व्यवहारांची मर्यादा सुद्धा सेट करू शकता. या फीचरमुळे संपूर्ण परिवाराच्या व्यवहाराचा तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतो.
✅ खर्चाचा आढावा (Spends analytics): आता तुम्हाला तुमच्या खर्चाची माहिती वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागून दिसेल. BHIM 3.0 ॲपच्या मुख्य स्क्रीनवर एक नवीन डॅशबोर्ड मिळेल, जे तुमच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे संपूर्ण तपशील दाखवेल. जसे की, तुम्हाला कोणत्या मित्राने पैसे पाठवले तर ते उत्पन्नाच्या श्रेणींमध्ये दाखवले जाईल. तुम्ही मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी, ऑनलाईन वीज बिल, ऑनलाईन इंटरनेट बिल, हॉटेल बिल इत्यादींसारखे बिल ऑनलाईन भरले तर ते तुम्हाला खर्चाच्या श्रेणींमध्ये दाखवले जाईल.
✅ स्मार्ट नोटिफिकेशन (Smart notification): तुमच्या नवीन बिल पेमेंटसाठी आणि वॉलेट बॅलन्स लिमिट कमी झाल्यास युजरला सतर्क करण्यासाठी नोटिफिकेशन्स पाठवण्यात येतील. ही सुविधा इतर खाजगी अँप्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
BHIM 3.0 मध्ये दुकानदारांसाठी नवीन फीचर्स
लहान आणि मध्यम दुकानदारांना कोणत्याही तृतीय-पक्ष ॲपशिवाय पेमेंट स्वीकारता यावे आणि यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी, BHIM 3.0 मध्ये NPCI व्यापाऱ्यांसाठी खास BHIM Vega नावाचे नवीन फीचर घेऊन आला आहे. यामुळे व्यापारांना आता ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची चिंता राहणार नाही.
National Payments Corporation of India (NPCI) मार्फत लवकरच BHIM 3.0 Google Play Store आणि Apple App Store सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. एप्रिल 2025 पर्यंत ते भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी वापरण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.