Home  |  व्हॉट्सअॅपची नवीन भूमिका: आता फक्त चॅटिंग नाही तर कमाईचे व्यासपीठ देखील

व्हॉट्सअॅपची नवीन भूमिका: आता फक्त चॅटिंग नाही तर कमाईचे व्यासपीठ देखील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Status Ads: स्टोरीज सारखाच अनुभव, पण आता स्पॉन्सरशिपसह

WhatsApp वर आता तुम्हाला स्टेटस टॅबमध्ये Ads म्हणजेच जाहिराती पाहायला मिळणार आहेत. Instagram स्टोरीसप्रमाणेच, हे Status Ads 24 तासांसाठी दिसतील आणि त्यावर ‘Sponsored’ असा स्पष्ट उल्लेख असेल. याचा उपयोग ब्रँड किंवा क्रिएटर्स त्यांच्या प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, किंवा प्रोफाइल्स प्रमोट करण्यासाठी करू शकतील.

मुख्य मुद्दे:

1) वापरकर्त्यांना कुठलाही वेगळा नोटिफिकेशन येणार नाही. फक्त ग्रीन डॉटच दाखवला जाईल.

2) या जाहिराती कंट्रोल करता येणार आहेत – तुम्हाला त्या ब्लॉक करता येतील.

3) हे फीचर सध्या Developer Version (v2.25.21.11) मध्ये टेस्ट होत आहे.

Promoted Channels: ब्रँडसाठी नवे दरवाजे

Promoted Channels हे फीचर बिझनेस युजर्ससाठी खास आहे. कंपन्या, संस्थानं किंवा सेलेब्रिटीज आपले चॅनल्स बनवू शकतात ज्यावर ते न्यूज, फोटो, व्हिडिओज शेअर करू शकतात.

काय वेगळं आहे?

1) हे चॅनल्स Status Tab खाली दिसतील.

2) यूजरने जर चॅनल सब्सक्राइब केला नसेल, तर त्यांना ते सहज दिसणार नाही.

3) आता Meta ने चॅनल्स प्रमोट करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे – म्हणजे थोडे पैसे खर्च करून आपले चॅनल टॉपला आणता येईल.

पण किती दिवस टॉपला राहील?

हे अजून स्पष्ट नाही, पण हे नक्की की Meta आता WhatsApp वरूनही कमाई करण्याच्या तयारीत आहे.

WhatsApp: आता फक्त गप्पा राहिलेले नाही, तर उत्पन्नाचे साधन बनले आहे.

WhatsApp आता Meta साठी एक "कमाऊ पूत" बनणार आहे. वापरकर्त्यांसाठी जरी हे फीचर्स फारसे उपयोगी न वाटले तरी बिझनेस आणि क्रिएटर्ससाठी हे खूप महत्वाचे ठरणार आहेत.

ज्यांना आपल्या ब्रँडचा पोहोच वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी WhatsApp एक सशक्त माध्यम बनण्याच्या वाटेवर आहे. अर्थात, थोडं बजेट तयार ठेवा – कारण आता WhatsApp वरही दुकानदारी लागणार आहे.

Meta ने हे दोन्ही फीचर्स – Status Ads आणि Promoted Channels – लॉन्च करून स्पष्ट केला आहे की WhatsApp फक्त मित्रांशी गप्पा मारण्यापुरता मर्यादित राहणार नाही.

"WhatsApp for business" ही कल्पना आता वास्तवात उतरते आहे, आणि लवकरच आपल्याला त्याचे परिणाम वापरातही दिसू लागतील."

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW