Tips to Remove Hair Color After Holi: रंगांची होळी खेळल्यानंतर केसांमधील रंग काढण्यासाठी वापरा घरगुती उपाय

केसांमधून रंग काढण्याचे घरगुती उपाय (Tips to Remove Holi Color from Hair)

आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊ जेणेकरून तुम्ही या होळीमध्ये तुमच्या केसांमध्ये लागलेला रंग काढू शकता.

नारळ तेलाचा वापर करा (Coconut Oil)

होळी खेळण्यासाठी जाण्याअगोदर तुम्ही तुमच्या केसांना नारळ तेल लावल्यास रंगांपासून केसांचे संरक्षण होण्यास मदत होईल. नारळ तेल केसांच्या मुळापर्यंत रंग पोहचू देत नाही. या उलट नारळ तेल केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांना पोषण देण्याचे काम करते.

या व्यतिरिक्त तुम्ही होळी खेळल्यानंतर सुद्धा नारळ तेल लावू शकता. असे केल्याने तुमच्या डोक्यातील रंग निघण्यास मदत मिळेल. कारण नारळ तेलात व्हिटॅमिन E पोषणतत्त्व असतात. तेल केसांना मऊ आणि स्मूथ ठेवण्याचे काम करते, त्यासोबतच केसांना लागणारे अँटी-ऑक्सिडंट्स केसांना मिळत असल्याने रंगांमधील रसायनामुळे नुकसान कमी होते.

केसांची मजबूत वाढ होते. त्यासाठी तुम्हाला होळी खेळल्यानंतर केसांमधील रंग काढण्यासाठी १ तास अगोदर तेल लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूचा वापर करून केस धुवा.

कच्चे दूध वापरा (Raw Milk)

कच्च्या दुधामध्ये प्रथिने (Proteins) भरपूर प्रमाणात असतात आणि त्यासोबत कॅल्शियम असतात.कच्च्या दुधामध्ये ग्लिसरीन एकत्र करून त्याला शॅम्पूमध्ये मिसळा आणि अंधोळ करा किंवा केस धुवा. या उपायाने तुमच्या केसांमधील रंग निघेलच,

पण त्यासोबत तुमचे केस हे सॉफ्ट आणि चमकदार सुद्धा राहतील. या मिश्रणात लॅक्टिक अॅसिड नावाचा पदार्थ तयार होतो, त्यामुळे तुमच्या केसांमधील रंग आणि घाण काढण्यास मदत करतो.

दही, ऑलिव्ह ऑइल आणि अंड्याचे मिश्रण (Curd, Olive Oil & Egg Mixture)

मित्रांनो, होळी खेळल्यानंतर एक अंडे घ्या, २ चमचे दही आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल (जैतुणाचे तेल) घ्या. या तिघांचे मिश्रण करून केसांना लावा आणि ३० मिनिटांनंतर थोडा शॅम्पूचा वापर करून केस धुवा.

या मिश्रणामुळे केसांमधील रंग निघेल आणि केस मऊ आणि चमकदार राहतील. कारण अंड्यात प्रथिने असतात. प्रथिन्यांमधून मिळणारे पोषण हे केसांना मजबूत बनवण्याचे काम करतात. तर दही केसांना कंडिशनिंग करण्याचे काम करते.

लिंबाचा रस आणि अलोवेरा जेल या मिश्रणाचा वापर करा (Lemon Juice & Aloe Vera Gel)

लिंबामध्ये व्हिटॅमिन C असतात तर लोवेरामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. या दोघांचे मिश्रण केसांमधील रंग काढण्यास मदत करते. त्यासाठी २ चमचे अलोवेरा जेल घ्या आणि त्यात १ चमचा लिंबाचा रस मिश्रण करा.

अंघोळ करण्याच्या २० मिनिटं अगोदर केसांमध्ये लावा आणि नंतर अंघोळ करा. असे केल्याने केसांमधील रंग तर निघेल पण तुमच्या केसांमधील डँड्रफ कमी होईल.

दही आणि बेसनचे मिश्रण (Curd & Gram Flour)

बेसन आणि दहीचे मिश्रण हे केसांसाठी खूप फायद्याचे आहे. कारण बेसन केसांमधील तेलगटपणा कमी करण्यास मदत करतो आणि केसांना स्वच्छ बनवतो. दही केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून कार्य करते.

दही आणि बेसनाचे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर २० ते ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुऊन घ्या. नंतर पहा तुमच्या केसांमधील रंग निघालेला असेल आणि तुमचे केस गुळगुळीत दिसतील.

लिंबू आणि मधाचे मिश्रण वापरा (Lemon & Honey)

मध हे नेसर्गिक औषध आहे, भारतातील ऋषी-मुनींनी सुद्धा पुस्तकांमध्ये मधाविषयी लिहिले आहे. मधात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे आपले केस निरोगी राहतात. केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

लिंबाच्या रसाचे आणि मधाचे मिश्रण तयार करून केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवा. होळीमुळे केसांमध्ये चिटकलेला रंग निघण्यास मदत होईल, त्यासोबत तुमचे केस मऊ आणि शाईन करतील.

टी ट्री ऑइल आणि नारळ तेलचा वापर (Tea Tree Oil)

टी ट्री ऑइल केसांमधील संसर्ग कमी करण्याचे काम करते, तर त्यासोबत टाळू स्वच्छ ठेवण्याचे सुद्धा काम करते. तुम्ही टी ट्री ऑइल आणि नारळाचे तेल मिश्र करून केसांना लावा, आणि नंतर थोळ्या वेळाने अंधोळा बसा.

यामुळे तुमच्या केसांमधील रंग लवकर निघण्यास मदत होईल आणि तुमच्या केसांमधील नैसर्गिक ऑईलची मात्रा संतुलित ठेवण्याचे काम करेल.

बटाट्याचा रस (Potato Juice)

बटाटा हा गरीब श्रीमंत प्रत्येकाच्या घरात मिळेल किंवा उपलब्ध होईल. बटाट्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन B6 (Vitamin B6) आढळतात. ते तुमच्या केसांची गळती थांबवते आणि केसांची वाढ सुद्धा थांबवते.

यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बटाट्याचा रस एका वाटीत काढून केसांना लावा. रस लावल्यानंतर २० मिनिटांनी केसांना स्वच्छ धुवा. यामुळे केसांमध्ये अटकलेला रंग निघण्यास मदत होईल.

सफरचंद व्हिनिगर आणि पाणी (Vinegar & Water)

हा पर्याय थोडा महागात पडणारा आहे. कारण यात तुम्हाला सफरचंदाचा व्हिनेगर घ्यायचा आहे. व्हिनेगर हे सफरचंदाच्या रसापासून तयार केलेले असते. एक ग्लास पाण्यात आणि २ चमचे सफरचंद व्हिनेगर यांचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे.

आणि केसांना लावायचे आहे. यामुळे केसांमधील रंग निघण्यास मदत होईल, त्यासोबत व्हिनेगरमुळे तुमच्या केसांचा pH संतुलित राहण्यास मदत मिळेल.

निष्कर्ष (Conclusion)

वरील घरगुती उपाय खूप सोपे आहेत. यामुळे होळीमध्ये रासायनिक रंगांमुळे तुमच्या केसांचे नुकसान टाळण्यापासून आणि सहजरीत्या तुमच्या केसांमधील रंग काढण्यास उपयोगी उपाय आहेत. यामुळे तुम्हाला होळीत तुमच्या केसांची काळजी करण्याची गरज राहणार नाही आणि तुम्ही आनंदाने ही होळी साजरा करू शकता.

फक्त वरती दिलेले उपाय अवश्य करून पहा. होळीचा आनंद मनसोक्त घ्या. त्यासोबत तुमची, तुमच्या परिवाराची आणि तुमच्या मित्रांची काळजी घ्या. आणि त्यांना ही हे घरगुती उपाय सांगा. होळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला लाख लाख शुभेच्छा.