PM kisan: पीएम किसान योजनेत ई-केवायसी करण्याचे प्रकार आणि ई-केवायसी ची संपूर्ण माहिती स्वतःच्या भाषेत जाणून घ्या

पीएम किसान योजनेत ई-केवायसी का?

पीएम किसान योजनेत ई-केवायसी करावी आणि सरकारने ई-केवायसी करण्यासाठी अनिवार्य का केले. याचे मुख्य कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ हा शेतकरी बांधवांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळावा.

कारण आधी शेतकरी बांधवाना कोणत्याही योजनेचा लाभ द्यायचा असेल तर आधी पैसे राज्य सरकारकडे देण्यात यायचे. मग राज्य सरकार ते पैसे जिल्हा स्तरावर पाठवायची, मग ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. या सर्व प्रक्रियेत खूप प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळायचा आणि योग्य शेतकरी लाभार्थीला योजनेचा लाभ मिळत नसे.

त्यामुळे सरकारने ई-केवायसी करून आधार क्रमांक बँक खात्यासोबत जोडून त्यांच्या खात्यात DBT मार्फत पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा या मुख्य उद्दिष्टाने ई-केवायसी केली जाते.

पीएम किसान योजनेत ई-केवायसी करण्याचे प्रकार?

पीएम किसान योजनेत शेतकरी लाभार्थी 3 प्रकारे ई-केवायसी करू शकतात. ते प्रकार खालीलप्रमाणे:

i) ओटीपी (OTP) चा वापर करून तुम्ही ई-केवायसी (e-KYC) करू शकता.

ii) बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी (बायोमेट्रिक ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही CSC किंवा SSK सेंटरवर जाऊन करू शकता)

iii) फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी (फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून करू शकता.)

पीएम किसान योजनेत ओटीपी (OTP) आधारित ई-केवायसी कशी करावी

आधार क्रमांक सोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून तुम्ही ई-केवायसी करू शकता. त्या विषयी सविस्तर माहिती पाहू.

i) सर्वप्रथम सरकारने तयार केलेल्या अधिकृत पीएम किसान वेबपोर्टलला भेट द्या. त्यासाठी तुम्ही समोर दिलेल्या लिंकचा वापर करू शकता (https://pmkisan.gov.in/)

ii) नंतर वेबपोर्टलवर उजव्या बाजूला किंवा खाली Farmers Corner मध्ये तुम्हाला e-KYC चे बटण दिसेल. त्या बटणावर क्लिक करून घ्या.

iii) पुढच्या पुष्टावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांक टाकून “Search” बटणावर क्लिक करा.

iv) पुढे तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकण्यासाठी विचारले जाईल. शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डमध्ये जो क्रमांक असेल, तोच मोबाईल क्रमांक टाकून “Get OTP” बटणावर क्लिक करा.

v) तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल. तो दिलेल्या रिकाम्या जागेत भरून घ्या आणि “Submit” बटणावर क्लिक करा.

vi) आता तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण झाल्याबद्दल संदेश दाखवला जाईल. याचा अर्थ तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही पीएम किसान योजनेत ओटीपी (OTP) आधारित ई-केवायसी करू शकता.

पीएम किसान योजनेत बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी कशी करावी

शेतकरी मित्रांनो, तुम्ही देशातील 4 लाखाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा राज्य सेवा केंद्र (SSK) वर जाऊन बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करू शकता. सविस्तर पाहू.

i) ई-केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल सोबत घेऊन CSC किंवा SSK सेंटरला भेट द्या.

ii) सेंटरवर आधारकार्ड आणि बायोमेट्रिकचा वापर करून ई-केवायसी पूर्ण करू शकता.

iii) तुमच्या नजीकचे CSC पाहण्यासाठी “https://locator.csccloud.in/” लिंकवर जाऊन पाहू शकता.

पीएम किसान योजनेत फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी कशी करावी

शेतकरी बांधवानो, तुमच्यासाठी सरकारने आता पीएम किसान योजनेत ई-केवायसी करण्यासाठी नवीन पद्धत उपलब्ध करून दिली आहे. काही वेळा शेतकरी OTP आधारित केवायसी करू शकत नाही. त्यासाठी बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन पद्धत उपलब्ध आहेत. फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी तुम्ही घरी बसून करू शकता.

ती कशी करावी, त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू.

i) फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store उघडून घ्या आणि तिथून पीएम किसान मोबाईल ॲप (PM-KISAN Mobile App) आणि आधार फेस आरडी ॲप (Aadhaar Face RD App) डाउनलोड करून घ्या.

ii) पीएम किसान मोबाईल ॲप उघडून घ्या आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने पीएम किसान ॲपमध्ये लॉग इन करून घ्या.

iii) लॉग इन झाल्यानंतर लाभार्थी स्थितीवर जा (Beneficiary Status) आणि तुमच्या ई-केवायसीची स्थिती तपासून घ्या. “Yes” असेल तर तुम्हाला ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही, पण ई-केवायसीची स्थिती “No” असेल तर तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल.

iv) समोरील e-KYC बटणावर क्लिक करून घ्या. आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकण्यासाठी विचारले जाईल. तिथे आधार नंबर प्रविष्ट करून घ्या.

v) आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी परवानगी विचारली जाईल. योग्य परवानगी देऊन तुमचा चेहरा स्कॅन करून घ्या.

vi) आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी परवानगी विचारली जाईल. योग्य परवानगी देऊन तुमचा चेहरा स्कॅन करून घ्या. तुम्ही अँपमध्ये तुमचा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

ई-केवायसी विषयी संपूर्ण माहिती तुमच्या भाषेत

पीएम किसान योजनेत ई-केवायसी कशी करावी, ई-केवायसीचे उद्दिष्टे, ई-केवायसी करण्याचे प्रकार या विषयी संपूर्ण माहिती तुम्ही वेगवेगळ्या भाषेत वाचू शकता.

सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबपोर्टलवर सर्व लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. किंवा तुम्ही खालील तक्त्यात सुद्धा पाहू शकता. तुम्ही तुमच्या भाषेनुसार माहिती पाहू शकता.

पीएम किसान वेबपोर्टलवरून तुम्ही माहिती कशी पाहू शकता, त्या विषयी सविस्तर माहिती.

फक्त तीन स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या भाषेत ई-केवायसी विषयी माहिती पाहू शकता. चला पाहू या त्या स्टेप्स कोणत्या.

1: बांधवानो सर्वात आधी पीएम किसान वेबपोर्टल उघडून घ्या. त्यासाठी तुम्ही समोरील लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता – https://pmkisan.gov.in/

2: त्यानंतर हेडर मेनू मधून “Know About e-KYC Process” या मेनूवर क्लिक करून घ्या.

3: तुमच्या समोर आता सरकारने ई-केवायसी विषयी माहिती ज्या ज्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्या त्या भाषा समोर दिसतील. त्यातील तुमची भाषा निवडून म्हणजे भाषेवर किंवा बाणावर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

खालील लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता.

पीएम किसान योजनेत ई-केवायसी करण्याचे फायदे

लाभार्थ्यांची ओळख

ई-केवायसी केल्याने योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची ओळख अचूकपणे करण्यास मदत होईल. आणि गरजू लाभार्थ्यांनाच मिळावा आणि योजनेतील खोट्या लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांची नावे योजनेतून कट करण्यास मदत होईल.

ऑनलाईन प्रक्रिया

पीएम किसान योजनेत ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असल्याने देशातील शेतकरी बांधवांना सरकारी कार्यालयाची वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे पैसे आणि अनमोल वेळ वाचेल.

बँक खात्यात थेट लाभ

शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण केली असता. शेतकरी बांधवांना योजनेचा पैसा हा थेट त्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केला जातो.

गैरव्यवहारांवर नियंत्रण

ई-केवायसी केल्याने पीएम किसान योजनेत खोट्या पद्धतीने रजिस्टर करून योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थी ओळख करून त्यांचा लाभ बंद करून वाचणारा निधी हा सरकारच्या दुसऱ्या कामांमध्ये वापरला जाईल.

टीप (Note)

1) शेतकरी बांधवांनो, तुम्ही ई-केवायसीचा कोणताही पर्याय निवडला तरी तुम्हाला त्याविषयीची अधिक माहिती 24 तासांनंतर अपडेट झालेली पाहायला मिळेल.

2) एक ई-केवायसी करण्यासाठी CSC तुमच्या कडून 15 रुपये आकारू शकते.

निष्कर्ष (Conclusion)

पीएम किसान योजनेत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी वरील दोन्ही पर्यायी पैकी एकाचा वापर करून ई-केवायसी करून घेणे जेणेकरून पीएम किसान योजनेतील येणारे हफ्ते हे नियमित तुमच्या बँक खात्यात जमा होत राहतील. आणि तुम्ही येणाऱ्या पैशांपासून तुमच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वापर करू शकता.