MahaDBT Portal: पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; जाणून घ्या बंद करण्यामागचे कारण

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया का बंद आहे?

आपल्याला माहित आहे. मराठी महिन्यानुसार आपले वित्तीय आणि आर्थिक वर्ष हे १ एप्रिलपासून सुरु होते. त्या प्रकारे या वर्षाचे नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात १ एप्रिल २०२५ पासून झाली. महाडीबीटी पोर्टलमध्ये खूप साऱ्या तांत्रिक अडचणी येत होत्या, जसे लॉगिन करण्यासाठी, अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांची नावे पाहण्यास इत्यादी, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

पण नवीन वर्ष लागल्यानंतर लगेच सरकारने पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्याचे काम सुरु केले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना अधिक चांगल्या सेवा मिळतील. परंतु कृषी विभाग मार्फत सध्या पोर्टलवर अर्ज प्रक्रिया करण्यास स्थगित देण्यात आली आहे. कृषी विभागाने या विषयी सूचना पोर्टलवर जारी सुद्धा केली आहे.

महाडीबीटी पोर्टल कधी सुरू होईल?

कृषी विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२५ नंतर हे पोर्टल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. पोर्टल चालू झाल्यानंतर शेतकरी नवीन नोंदणी करू शकतील आणि या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतील.

म्हणून राज्यातील तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे की थोडा संयम ठेवा आणि नवीन पोर्टल सुरू होण्याची वाट पहा. या नवीन पोर्टलमध्ये खूप सारे बदल करण्यात येऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नोंदणीपासून ते अनुदान मिळेपर्यंत, नवीन योजनापासून ते अनुदानासाठी तुमच्या नावाची घोषणा होईपर्यंत खूप सारे बदल करण्यात येणार आहेत.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध योजना

महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. हे पोर्टल योजनांचा लाभ मिळवून देण्यास उपयुक्त आहे. महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना आहेत, त्यापैकी काही योजनांची नावे खालील प्रमाणे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक) - Per Drop More Crop (Micro-irrigation Component)
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान - Sub-mission on Farm Mechanization
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस - National Food Security Mission
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य) - Birsa Munda Krishi Kranti Yojana
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना - Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान - Mission for Integrated Development of Horticulture
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम - Rain fed Area Development Program
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना - Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana
राष्ट्रीय कृषी विकास योजना (रफ्तार) - Rashtriya Krushi Vikas Yojana (RAFTAAR)
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना - State Agriculture Mechanization Scheme
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना - Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना - वैयक्तीक शेततळे - Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme - Individual Farm Ponds
RKVY Plastic Lining to Farm Pond
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना - Dr. Shyamprasad Mukherjee Jan-Van Vikas Scheme

महाडीबीटी पोर्टलविषयी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पोर्टलवर सूचना जरी केली आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. १५ एप्रिल नंतर पोर्टल पुन्हा पूर्ववत सुरू होईल. ज्या शेतकरी बांधवांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनी १५ एप्रिल नंतर पुन्हा लॉगिन करून तुमच्या प्रोफाइल विषयी आणि अर्ज प्रक्रियेची माहिती तपासून घ्यावी. आणि ज्या शेतकरी बांधवांना पोर्टलवर नवीन अर्ज करायचा आहे, त्यांनी पोर्टल चालू होण्याची वाट पाहायची आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर नवीन नोंदणी करावी.