Home  |  जैविक शेती विषयी संपूर्ण माहिती | Information about Organic farming

जैविक शेती विषयी संपूर्ण माहिती | Information about Organic farming

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जैविक शेती म्हणजे काय? | What is organic farming?

जैविक शेती म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता केली जाणारी शेती म्हणजे जैविक शेती होय. ही शेती जैविक खतांद्वारे केली जाते. या शेतीत घरगुती बियाणे (seed) आणि खते (Fertilizers) वापरली जातात. उदाहरणार्थ, गांडूळ खत, शेणखत, पालापाचोळा इत्यादी. यांचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजे जैविक शेती होय.

जैविक शेती आणि रासायनिक शेतीमधील फरक | Difference between organic farming and chemical farming

जैविक शेती रासायनिक शेती
नैसर्गिक खतांचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजेच जैविक शेती होय. रासायनिक खतांचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजेच रासायनिक शेती होय.
जैविक शेतीत नैसर्गिक खतांचा वापर करून फळे, कडधान्ये पिकवले जातात. रासायनिक शेतीत पूर्णतः रासायनिक पदार्थांचा वापर करून फळे, कडधान्ये पिकवले जातात.
जैविक शेती करण्यासाठी रासायनिक शेतीपेक्षा कमी खर्च लागतो. रासायनिक शेती करण्यासाठी खर्च जास्त प्रमाणात लागतो.
जैविक शेतीपासून मिळणारे उत्पन्न शरीरासाठी फायदेशीर असते. रासायनिक शेतीपासून मिळणारे उत्पन्न शरीरासाठी हानिकारक असते.

जैविक शेतीचे महत्त्व | Importance of organic farming

  • कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती केली जाते.
  • जैविक शेती ही अधिक लाभदायक शेती आहे.
  • शेतीतून निघणारे उत्पन्न (Income) हे आरोग्यासाठी (Health) अधिक फायदेशीर असते.
  • शेतातील मातीची झीज खूप कमी प्रमाणात होते.
  • जैविक शेतीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण (Pollution) होत नाही.
  • पशुंच्या साहाय्याने सुद्धा ही शेती केली जाते.

जैविक खत तयार करण्यात उपयोगात येणाऱ्या नैसर्गिक गोष्टी

जनावरांचे शेण

  • गायीचं शेण
  • म्हैशींचं शेण
  • बकऱ्यांच्या लेंड्या
  • मेंढीच्या लेंड्या
  • कोंबड्यांची विष्ठा

शेतातील कूडा

  • शेतातील तण, भुसा
  • ओला भाजीपाला
  • उसाची पत्ती
  • बगिच्याची पाने

पालापाचोळा

  • झाडांची साल
  • रस्त्यावर पडलेल्या झाडांचा पाला
  • वेगवेगळ्या झाडांची पाने (Leaves of trees)

जैविक खत बनवण्याची प्रक्रिया (जैविक बीज उपचार)

शेणखत

शेणखत वापरून खत तयार करणे म्हणजेच शेणाचा वापर करून जैविक खत बनवणे आणि त्या तयार केलेल्या खताचा वापर शेतात करून शेती करावी.

कडुलिंब

कडुलिंबाच्या पालांचा वापर करून म्हणजेच त्यांना कुजवून त्यापासून शेतीसाठी पूरक असे खत बनवून त्याचा वापर शेतात करून त्यापासून शेती करणे

गांडूळखत (Vermicompost)

गांडूळ वापरून खत बनवणे म्हणजे शेतातील पालापाचोळा जमा करून त्याच्यात पाणी मिसळून त्यांना सळण्यासाठी ठेवणे, त्यानंतर त्यात गांडूळ सोडून त्यांच्यातून खत तयार करून त्यापासून शेती करणे.

जैविक शेतीचे सिद्धांत | Principles of Organic Farming

  • निसर्गाचा या शेतीला वारसा असतो.
  • शेतात जे काही टाकले जाईल त्याला मातीच हेच सर्वकाही असेल.
  • पर्यावरण विकसित (Environment developed) होईल.

शेतकऱ्यांच्या समस्या | Problems of farmers

भारतामध्ये प्रत्येक राज्यात शेती हा एक उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेतकरी हा शेतात अपार कष्ट करून शेतीमधून जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करतो. शेतीत कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर करावा या विषयी जनजागृती (Public awareness) कमी असल्याने, जास्त उत्पन्नाच्या आशेने शेतकरी रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर करतात.

त्यामुळे जमिनीचा pH हा घटत जातो. आणि वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होताना दिसतेय. या समस्यांमधून निघण्यासाठी शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर होण्यासाठी त्यांना पारंपरिक शेतीकडे म्हणजे जैविक खतांचा वापर करून शेती करण्यास प्रोत्साहित करावे लागेल.

जैविक शेती आणि आरोग्य | Organic farming and health

शेतकरी जैविक शेती जर करेल तर त्याला नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता भासेल व नैसर्गिक गोष्टी म्हटल्यास विषयच संपला. आपल्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचाच उपयोग करून जर शेतकरी शेती करेल तर ते पीक अत्यंत चांगल्या पद्धतीने असेल

म्हणजेच त्या पिकांचा वापर करून जर आपण अन्न शिजवले तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल म्हणजेच त्या पासून आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

जैविक शेती म्हंटली म्हणजे शेतीतील खराब कचरा, कडुलिंबाचा पाला पाचोळा, शेणखत, इतर पालापाचोळा, गांडूळखत, कुंजलेले फळे, भाजेपाल्यांचा अवशेष इत्यादी.

गोष्टींचा वापर करून बनवण्यात येणारी खत व त्या खतांवर केली जाणारी शेती म्हणजेच पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारी शेती व अशा शेतीतील अन्न जर आपण खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरेल म्हणजे त्यामुळे जैविक शेतीमुळे आरोग्य खूप चांगले राहील.

आरोग्य निरोगी बनवण्याचं एकमेव साधन आहे. म्हणून आपण आरोग्य वाचवण्यासाठी जैविक शेती ही कमीच पाहिजे.

जैविक शेती काळाची गरज आहे

जैविक शेती ही येत्या काही वर्षात आपल्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनेल कारण पहिले लोक हे जैविक शेती करायचे, त्यामुळे धान्य हे पौष्टिक रूपात आपल्याला भेटत असे. परंतु आता रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते.

त्यामुळे त्या शेतीचे उत्पन्न (Agricultural income) आपल्या साठी हानिकारक असते, त्यामुळे आपल्याला आजार होतात. जैविक शेतीचे उत्पन्न खाऊन माणूस अधिकाधिक वर्षे जगत असे, परंतु आता मानवाचे जीवन सुद्धा कमी झालेत. १०० – १२० वर्ष जगणारा माणूस ५०-६० वर्ष जगत आहे.

यांचे कारण काय? (What is the reason for it?) त्यामुळे जैविक शेती करून त्याशेतीतून मिळणारे पौष्टिक अन्न आपण खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य व शरीर दोघेही स्वस्थ राहतील. त्यामुळे जैविक शेती काळाची गरज आहे.

थोडक्यात जैविक शेतीचे महत्व

जैविक शेती ही प्रामुख्याने नेसर्गिक केली जाणारी शेती आहे. ही शेती नेसर्गिक रित्या केली जाते, म्हणून या शेतीचे खूप महत्व आहे. ही शेतीचे फायदे देखील खूप आहेत. ही शेती निसर्गाच्या वस्तूंच्या द्वारा केली जाते,

म्हणून ही शेती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते व आपल्या जमिनीचे आरोग्य बळकट ठेवण्यास मदत करते. आपण जैविक खतांचा वापर करून शेती केली, तर ती खते आपल्या जमिनीला काहीही नुकसान पोहचवत नाही; त्याउलट, आपली जमीन अधिक सुपीक बनवते.

जैविक शेती करताना प्रामुख्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकरी काढत असतो. शेतकरी घरीच जैविक खत बनवून ही शेती करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका नसतो. जैविक शेती आरोग्यासाठी अत्यंत फायद्याची शेती आहे. ही शेतीतील उत्पन्न आपल्या आरोग्याला चांगले ठेवते.

असे अनेक फायदे जैविक शेतीपासून आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण जैविक शेती करायला पाहिजे व तिचा पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपले पुढील आयुष्य हे अधिक स्वस्थ आणि चांगले होईल.

जैविक शेती आणि सेंद्रिय शेतीतील फरक

  • जैविक शेती ही नैसर्गिक साधनांचा वापर करून खते तयार करून केली जाणारी शेती होय.
  • सेंद्रिय शेती ही पारंपरिक बियाण्यांपासून केली जाणारी शेती होय.
  • जैविक आणि सेंद्रिय शेती या दोन्ही शेती रासायनिक खतांचा वापर न करता केली जाणारी शेती होय.

जैविक शेतीचे फायदे | Advantages of organic farming

  • जैविक शेती ही नैसर्गिक प्रकारे केली जाणारी शेती आहे.
  • जैविक शेती ही कमीत कमी खर्चात होते.
  • जैविक शेती ही निसर्गावर अवलंबून असते.
  • जैविक शेतीपासून शेतकरी बिना मिलावट धान्य पिकवतात.
  • जैविक शेतीमधून मिळणारे उत्पन्न आपल्यासाठी फायदेशीर असते.
  • जैविक शेतीतील उत्पन्न आपले शरीर सुरक्षित ठेऊ शकते.

जैविक शेतीवर उपाययोजना

जैविक शेती अधिक प्रगतशील बनवण्यासाठी तिला अधिकाधिक जैविक खतांचा वापर करून तयार करायला पाहिजे. जेणेकरून शेतीतून मिळणारे उत्पन्न हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

शेतकरी जैविक शेती सोडून रासायनिक खतांकडे का वळतोय

जैविक शेती ही नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजेच नैसर्गिक खतांद्वारे केली जाते. म्हणजेच त्या शेतीचे उत्पन्न हे थोड्या दिवस उशिरा शेतकरी बांधवांच्या हातात येते.

आणि त्याचे उलट, रासायनिक खते वापरून शेतकरी कमी वेळात जास्त उत्पन्न घ्यायचा फायदा पाहतो. म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकरी जैविक शेती सोडून रासायनिक शेतीकडे वळत आहे.

निष्कर्ष (Conclusion)

जैविक शेती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या फायद्यासाठी अत्यंत महत्वाची शेती आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. या शेतीला करण्यास शेतकऱ्यास अगदी कमी माफक दरात सोयीस्कर पद्धतीने शेती करता येते.

या शेतीत नैसर्गिक साधनांचा वापर करून त्याने बियाणे तयार करून वापरावी लागतात. जैविक शेती ही आपल्या भावी आयुष्यात अत्यंत महत्वाची शेती आहे. या शेतीमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल म्हणजेच जैविक शेतीतील धान्य पीक आपल्या शरीरास काहीही हानी पोहोचवणार नाही व आपले आरोग्य चांगले राहील.

जैविक शेती केल्याने पर्यावरणाला देखील नुकसान होणार नाही. जैविक शेतीमुळे मातीची सुपीकता कमी होणार नाही. त्याउलट, मातीला पोषक तत्व हे पुरेपूर प्रमाणात मिळते, म्हणून मातीची झीज होणार नाही. त्या उलट, शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा हानी होणार नाही.

रासायनिक खते वापरून शेतकरी स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून त्याचा उपयोग करत असतो. जैविक शेती ही जैविक खतांपासून होत असते, म्हणून त्या शेतीपासून किंवा ती शेती करताना शेतकऱ्यांना काहीच नुकसान होत नाही.

जैविक शेती ही जास्तीत जास्त लोकांनी केली पाहिजे व तिचा फायदा घेतला पाहिजे. ज्याने करून आपले आरोग्य व पर्यावरण दोन्ही गोष्टी सुरक्षित राहतील.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW