Home  |  Traffic fine rates increased: ट्रॅफिक दंडाचे नवीन दर जाहीर, नियम मोडणे आता महागात पडणार

Traffic fine rates increased: ट्रॅफिक दंडाचे नवीन दर जाहीर, नियम मोडणे आता महागात पडणार

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

असे असणार सुधारित दंडाचे नवीन दर

१) आधी सीटबेल्ट न लावता वाहन चालवताना आढळल्यास १०० रुपये दंड भरावा लागत असे. आता दंडाच्या रकमेत वाढ करून नवीन दंड १,००० रुपये करण्यात आला आहे.

२) ट्रिपल सीट प्रवास करताना पकडल्या गेल्यास आधी १०० रुपये दंड भरावा लागत होता. आता नवीन दरानुसार १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

३) हेल्मेट विषयी देशात अनेक वेळा नवीन कायदे बनवले गेले आहेत. आधी विना हेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास १०० रुपये दंड आकारला जायायचा, आता त्यात बदल करण्यात आले आहेत. आता १,००० रुपये दंड किंवा ३ महिने लायसन्स जप्त करण्यात येणार आहे.

४) नवीन गाडी घेताना आपल्याला गाडीचा विमा हा घ्यावाच लागतो, पण काही वर्षांनी त्याची मुदत संपते. आणि विम्याला नूतनीकरण करण्याचे टाळतो. आधी अशा वाहन मालकांना २०० रुपये ते ४०० रुपये दंड भरावा लागत होता.

आता मागील दंडात सरकारने बदल केले आहेत आणि आता विमा नसलेली गाडी चालवल्यास त्या गाडीवर पहिल्यांदा २,००० रुपये दंड घेण्यात येणार आहे. आणि वॉर्निंग देऊन वाहन चालकाला सोडण्यात येईल. पण दुसऱ्यांदा गाडी पकडल्या गेल्यास ४,००० रुपये दंड किंवा ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

५) धोकादायकपणे म्हणजे नियमांचे पालन न करता गाडी चालवणे. यासाठी आधी ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता, आता अशा प्रकारे वाहन चालवताना आढळ्यास ५,००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

६) अतिवेगाने गाडी चालवताना आढळल्यास आधी ५०० रुपये दंड घेतला जायायचा, आता रस्त्यांवर अशा प्रकारे वाहन चालवताना आढळल्यास ५,००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

७) वाहतूक सिग्नल तोडताना आढळ्यास आधी वाहन चालकाला ५०० रुपये दंड आकारला जात होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. या पुढे रस्त्यांवरील सिग्नल तोडताना आढळ्यास वाहन चालकाला ५,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

८) काही लोकांना वाहन चालवतांना मोबाईल फोनवर बोलण्याची खूप वाईट सवय आहे. यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालतात, त्या सोबत इतरांचा ही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे सरकारने अशा वाहनचालकांची दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.

आधी असे कृत्य करताना पकडला गेल्यास ५०० रुपये दंड आकारला जायायचा, आता यात वाढ करून १० पट वाढ ही दंडात केली आहे; आता ५,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

९) दारू पिऊन गाडी चालवणे आता खूप जास्त महागात पडणार आहे. यासाठी आधी १,००० रुपये ते १,५०० रुपये दंड आकारण्यात येत असे. आता मद्यपान करून गाडी चालवताना आढळल्यास १०,००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांचा तुरुंगवासाची सजा भोगावी लागणार आहे.

१०) आपत्कालीन सेवा प्रदान करणाऱ्या वाहनांना रस्ता न देणं सुद्धा आता महागात पडणार आहे. आधी असे कृत केले असता १,००० रुपये दंड आकारला जायायचा. आता दंडात वाढ करण्यात आली आहे; आता १०,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

११) खूप वेळेस असे पाहण्यात येते की लोकांकडे लायसन्स नसते. आधी सरकार अशा लोकांकडून ५०० रुपये दंड घेत होते. पण आता सरकारने यात वाढ केली आहे. आता अशा लोकांकडून ५,००० रुपये दंड घेण्यात येणार आहे.

१२) आपण आपल्या आजू-बाजूच्या परिसरात पाहतो. कमी वयाचे मूल गाडी चालवताना दिसतात. सरकार अशा मुलांच्या पालकांकडून २,५०० रुपये दंड घेत होते. पण आता दंडाच्या रकमेत बदल केला आहे. आता नवीन नियमानुसार अशा पालकांना २५,००० रुपये किंवा ३ वर्षांचा तुरुंगवास आणि १ वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

१३) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) विना गाडी चालवताना आढळ्यास आधी १,००० रुपये दंड आकारला जायचा. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. या पुढे विना PUC गाडी चालवताना आढळ्यास १०,००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल.

१४) ओव्हरलोडिंग वाहन चालवताना आढळ्यास आधी २,००० रुपये दंड आकारण्यात येत होते. आता २०,००० रुपये आकारण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet